शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन ओपन टेनिस : फेडरर, नदाल विजेतेपदाचे दावेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:53 IST

अनेक दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत उद्या (सोमवार)पासून सुरू होण-या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत राफेल नदाल व रॉजर फेडरर हेच विजेतेपदाचे प्रमुख दावेदार असणार आहेत. त्याचबरोबर महिला गटात आठ खेळाडूंचे लक्ष विजेतेपदाबरोबरच...

न्यूयॉर्क : अनेक दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत उद्या (सोमवार)पासून सुरू होण-या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत राफेल नदाल व रॉजर फेडरर हेच विजेतेपदाचे प्रमुख दावेदार असणार आहेत. त्याचबरोबर महिला गटात आठ खेळाडूंचे लक्ष विजेतेपदाबरोबरच नंबर वन रॅँकिंगकडे असणार आहे.नदाल व फेडरर या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. हे दोन्ही दिग्गज खेळाडू अमेरिकन ओपन स्पर्धेत आतापर्यंत एकमेकांविरुद्ध खेळलेले नाहीत. मात्र या वेळी उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांची लढत होऊ शकते. जागतिक क्रमवारीत दोन नंबरवर असलेला व २०१२ चा विजेता असलेल्या अ‍ॅँडी मरे याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. यामुळे नदाल-फेडरर यांच्या अंतिम लढतीची शक्यता संपुष्टात आली. अंतिम फेरीपूर्वीच त्यांच्यात लढत होणार आहे.पाच वेळा यूएस ओपन जिंकणा-या फेडररने या वेळी विजेतेपद पटकावल्यास तो यूएस ओपन जिंकणारा सर्वांत जास्त वयाचा खेळाडू बनणार आहे. ज्वेरेव किर्गीयोस व डॉमनिक थिम या खेळाडूंनाही विजेतेपदाची संधी आहे.महिला गटातील सामने रोमहर्षक होण्याची शक्यता आहे. सेरेना विल्यम्स व व्हिक्टोरिया अझारेंका स्पर्धेबाहेर असल्याने आठ खेळाडूंकडे नंबर वन बनण्याची संधी मिळणार आहे. मारिया शारापोव्हा डोपिंग प्रकरणानंतर प्रथमच ग्रॅँडस्लॅम स्पर्धेत उतरणार आहे. तिच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.जागतिक क्रमवारीत नंबर वनवर असणा-या कॅरोलिना पिलिस्कोव्हाला आपले स्थान कायम ठेवणे सोपे असणार नाही. रोमानियाची सिमोना हालेप, डेन्मार्कची कॅरोलिना वॉझ्नियाकी, गर्बाइन मुगुरुजा, इलिना स्वेतलाना, जोहाना कोंटा व स्वेतलाना कुझ्नेत्सोवा यांनाही नंबर वन बनण्याची संधी आहे. व्हीनस विल्यम्स नवव्या स्थानी असून, तिलाही ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. त्याचबरोबर अँजेलिक केर्बरही जेतेपदाची दावेदार आहे.