Sara Khan steps into the shoes of Mahek Chahal | महक चहलच्या जागी सारा खानची वर्णी

महक चहलच्या जागी सारा खानची वर्णी

छोट्या पडद्यावर सपना बाबुल का बिदाई ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. या मालिकेत अभिनेत्री सारा खान हिने सा-यांची मनं जिंकली होती. साराच्या अभिनयासह तिच्या अदाही रसिकांना भावल्या होत्या.मालिका बंद झाल्यानंतर ती बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यामुळे जास्त चर्चेत आली. विशेष म्हणजे तिचा विवाहसोहळाही याच शोमध्ये ऑनस्क्रीन रंगल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर ती छोट्या पडद्यावर काही झळकलीच नाही. आता मोठ्या ब्रेकनंतर ती पुन्हा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. 

‘एक थी रानी एक था रावण’मध्ये महक चहलच्या जागी आता सारा खानची वर्णी लागल्याचे समजतंय. मालिकेत ती गायिकेची भूमिका साकारत असून‘स्लमडॉग मिलेनियर’मधील रिंग रिंग रिंगा वरील आपल्या डान्स मूव्ह्‌सनी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

ह्या डान्स परफॉर्मन्ससाठी आधी महकला घेण्यात आले होते, आता तिच्या तारखा उपलब्ध नसल्यामुळे तिच्या जागी सारा खान दिसून येईल. अभिनयाच्या पलीकडे सारा खान संधी शोधत असताना ह्या संधीबद्दल ती अतिशय उत्साहात आहे. तिने आपला सराव सुरू केला असून ती लवकरच शोमधील ह्या डान्स सीक्वेन्सच्या चित्रीकरणाला सुरूवात करेल.

सारा म्हणाली, “खुद्द ए.आर.रेहमान यांच्या गाण्यावर परफॉर्म करण्याबद्दल मी खूपच उत्साहात आहे. महक ही एक उत्तम डान्सर आहे आणि आपल्या मूव्ह्‌ससह तिने सा-यांचीच वाहवा मिळवली आहे. त्यामुळे ह्या परफॉर्मन्सला पूर्ण न्याय देण्यासाठी मी अथक मेहनत घेत आहे. ‘एक थी रानी एक था रावण’चा हिस्सा बनणे ही माझ्यासाठी एक मोठी संधी असून मी यासाठी खूपच उत्सुक आहे.”

आता साराप्रमाणेच तिची बहिण छोट्या पडद्यावरील रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. साराची बहिण आर्यानेहीअभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.एकता कपूर 'कसौटी जिंदगी की २'मालिकेत झळकत आहे. या मालिकेतून आर्या आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. मोठी बहिण साराप्रमाणेच आर्यासुद्धा हॉट, बोल्ड आहे. काही महिन्यांपूर्वी आर्या थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होती. त्यावेळी केलेल्या धम्माल मस्तीचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. यांत तिचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. सप्टेंबर महिन्यात 'कसौटी जिंदगी की- २' हा शो रसिकांच्या भेटीला आला असून सात वर्षांनंतर एकता कपूर हा शो नव्या स्टारकास्टसह पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आला आहे. 


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sara Khan steps into the shoes of Mahek Chahal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.