'देवमाणूस' मालिका रंजक वळणावर,अजित-डिंपलला जड जाणार इन्सपेक्टर जामकरच्या घरचा पाहुणचार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 12:50 PM2022-05-06T12:50:42+5:302022-05-06T12:51:07+5:30

Devmanus 2: 'देवमाणूस' या मालिकेला पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे.

'Devmanus' series turns out to be interesting, Ajit-Dimple will have a hard time visiting Inspector Jamkar's house | 'देवमाणूस' मालिका रंजक वळणावर,अजित-डिंपलला जड जाणार इन्सपेक्टर जामकरच्या घरचा पाहुणचार

'देवमाणूस' मालिका रंजक वळणावर,अजित-डिंपलला जड जाणार इन्सपेक्टर जामकरच्या घरचा पाहुणचार

googlenewsNext

'देवमाणूस २' (Devmanus 2) या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. देवमाणूस या मालिकेला पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. या मालिकेत नुकतेच एका नवीन व्यक्तिरेखेची एन्ट्री झाली आहे. ती म्हणजे इन्स्पेक्टर मार्तंड जामकर. अजितकुमारला या पर्वात कोणाचाही धाक नाहीये असं वाटत असतानाच इन्स्पेक्टर मार्तंड जामकर यांची मालिकेत एंट्री झाली आणि मालिकेत एक रंजक वळण आले. मार्तंड जामकर आता अजितकुमारचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार की नाही हे पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
    
प्रेक्षकांनी मालिकेत पाहिले की जामकरला संशय आहे की अजित या गावात एकटा नसणार. त्याला बज्या, नाम्या आणि डिंपल या तिघांवर शंका आहे. या तिघांपैकी कोणीतरी अजितला मदत करत असेल. नाम्या आणि बज्याची तो चौकशी करतो. त्याला कळतं की या दोघांचा यामध्ये हात नाही आहे. उरली डिंपल, सेलिब्रिटी म्हणून तिला फोटो काढण्याच्या बहाण्याने स्टेशनला घेऊन जातो आणि दिवसभर बसवून ठेवतो. त्यामुळे अजित खूप अवस्थ आहे. डिंपलने जर तोंड उघडले तर जामकरला पुरावे सापडतील. जामकरला पुरावे सापडतील.

डिंपल तोंड उघडत नाही आणि याचा फायदा घेऊन अजित गावभर पसरवतो की देवमाणसाच्या पत्नीला नव्या पोलीस अधिकाऱ्याने दिवसभर स्टेशनमध्ये बसवून ठेवले आणि त्रास दिला. याच्यामुळे गावात जामकर विरोधात चर्चा सुरू होते आणि ती जामकारच्या कानावर पडते. तो प्रायश्चित्त म्हणून दोघांना घरी जेवायला यायला आमंत्रण देतो. त्याच वेळेला अजितला जमिनीसाठी आमदाराचे बोलावणे येते. आता दोघांपुढे नेमकं कुठे जायचं ह्याचा पेच पडतो. ते दोघे जामकारच्या घरी जातात पण त्यांना आमदारकडे जायचंय म्हणून दोघेही अस्वस्थ आहेत. जामकर त्यांना जेवण वाढतो आणि म्हणतो की साग्रसंगीत जेवण केलं आहे तुमच्यासाठी साग्र झालं आता संगीत हवं असं म्हणून दोघांसाठी गाणं म्हणून डान्स करतो. अजित डिंपल मात्र घाबरलेले आहेत, जामकारचा यात काही डाव तर नसेल ना? जामकारचा हा पाहुणचार अजित आणि डिंपलला महागात तर नाही पडणार? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळेल.

Web Title: 'Devmanus' series turns out to be interesting, Ajit-Dimple will have a hard time visiting Inspector Jamkar's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.