Bigg boss ex contestant jasleen matharu cleaning floor with broom in a mall | बिग बॉसच्या स्पर्धकावर आलीय मॉलमध्ये झाडू मारण्याची वेळ, हा घ्या पुरावा
बिग बॉसच्या स्पर्धकावर आलीय मॉलमध्ये झाडू मारण्याची वेळ, हा घ्या पुरावा

जसलीन मथारूने बिग बॉस मध्ये वेगवेगळे कारनामे करत रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. घरात भजनसम्राट अनुप जलोटा यांची प्रेयसी बनत तिने एंट्री केली होती. आजही जसलीन मथारू नाव घेताच समोर अनुप जलोटा आणि त्यांचे कारनामे नाही आठवले तरच नवल.  जसलीन मथारुचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत जसलीन एका मॉलमध्ये झाडू मारताना दिसतेय. जसलीनचा झाडू मारतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. 


जसलीनचा स्वत:चा हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जसलीन एका दुकानात झाडू काढताना दिसतेय. त्याचे झाले असे की जसलीन या दुकानात झाडू विकत घ्यायला गेली होती म्हणून ती झाडू मारुन चेक करताना दिसतेय. जसलीनच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांना भन्नाट कमेंट्सदेखील केल्या आहेत.  


बिग बॉसमुळे जसलीनला खूप पब्लिसिटी मिळाली. मात्र त्यावेळी अनुप जलोटा यांनी जसलीन मथारूला गर्लफ्रेंड बनवणे खूप महागातही पडले. त्यानंतर त्यांनी  या सगळ्या प्रकरणावर सारवासरव करण्याचा प्रयत्न केला. ती फक्त माझी शिष्या आहे आणि मी तिचा गुरू आहे. मी तिला संगीत शिकवतो. आमच्यामध्ये गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्डचे कुठलेही नाते नाही.

Web Title: Bigg boss ex contestant jasleen matharu cleaning floor with broom in a mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.