Baliamama and Satyavaca weddings to be played in the series! | मालिकेत रंगणार बाळूमामा आणि सत्यवाचा विवाहसोहळा !
मालिकेत रंगणार बाळूमामा आणि सत्यवाचा विवाहसोहळा !

बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिका आता एका महत्वपूर्ण आणि रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. मालिकेमध्ये अखेर  बाळूमामा आणि सत्यवा यांचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. पहिल्यापासून बाळूमामांचा सत्यवाबरोबर लग्न करण्यास नकार होता. अनेक प्रयत्न करूनही बाळूमामा लग्नाला होकार देत नव्हते. मात्र सुंदराच्या सांगण्यावरून हलसिद्धनाथांचा कौल घेण्यास बाळू तयार होतो. अखेर बाळूमामानी लग्नास होकार द्यावा यासाठी हलसिद्धनाथ बाळूमामांना कौल देतात त्यानुसार बाळूमामांसमोर सत्यावाशी लग्न करण्यावाचून पर्याय उरत नाही. कौल विरोधात गेल्यानंतरही बाळूमामा लग्न टाळण्यासाठी प्रयत्न करतात पण ते असफल होतात. 


अखेर बाळूमामा सत्यवाशी लग्न करण्यास तयार होतात... यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण...अनेक विरोधातून घडणार हे लग्न बाळूमामा आणि सत्यवाचा आयुष्यात अनेक नाट्यमय वळण घेऊन येणार आहे. बाळूमामा आणि सत्यवचा हा संसार कसा फुलणार हे बघणं रंजक ठरणार आहे. याचसोबत मालिकेत बाळूमामांच्या प्रपंच्याचा, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरिबांच्या  हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार प्रेक्षकांना घडणार आहे. 


 

Web Title: Baliamama and Satyavaca weddings to be played in the series!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.