शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

जिओनी एस१० लाईट : जाणून घ्या सर्व फिचर्स 

By शेखर पाटील | Updated: December 25, 2017 19:08 IST

जिओनी कंपनीने आपले एस १० लाईट हे मॉडेल लाँच केले असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

जिओनी कंपनीने या वर्षी मे महिन्यात एस१० लाईट हा चार कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला होता. हे मॉडेल अद्याप भारतात सादर करण्यात आले नाही. तथापि, आता याची ‘लाईट’ या नावाने नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे. अर्थात यात आधीच्या मॉडेल्सच्या तुलनेत थोडे कमी फिचर्स आहेत. जिओनी एस १० लाईट या मॉडेलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप दिलेला नाही. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी  एलईडी फ्लॅशसह १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. यात अद्ययावत फेसियल इनहान्समेंट प्रणाली दिलेली आहे. याच्या मदतीने फेस डिटेक्शन करून त्यावर तात्काळ प्रक्रिया करता येते. तर यात ड्युअल टोन एलईडी फ्लॅश, पीडीएएफ आणि एफ/२.० अपार्चरसह १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे.

जिओनी एस १० लाईट या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात स्प्लीट स्क्रीन आणि आय प्रोटेक्शन मोड प्रदान करण्यात आले आहेत. क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन ४२७ प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी इतके असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा देण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडपासूनन विकसित करण्यात आलेल्या अमिगो ओएस ४.० या प्रणालीवर चालणारे आहे. या इंटरफेसमुळे अ‍ॅप लॉक, प्रायव्हेट स्पेस आदी सुविधा मिळतील. सर्वात महत्वाचे म्हणजे या स्मार्टफोनवर एकचदा तीन व्हाटसअ‍ॅप अकाऊंट वापरता येणार आहेत.

जिओनी एस १० लाईट या मॉडेलमध्ये ३१०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. हा स्मार्टफोन ग्राहकांना १५,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. दरम्यान, हा स्मार्टफोन खरेदी करणार्‍यांना पेटीएम आणि जिओने काही ऑफर्सदेखील दिल्या आहेत. यात पेटीएम मॉलवरून ३५० रूपयांपेक्षा जास्त खरेदी करणार्‍या ग्राहकांना ५० कॅशबॅक मिळणार आहेत. तर जिओच्या ग्राहकांना ३०९ वा त्यापेक्षा जास्तच्या रिचार्जवर १० महिन्यांपर्यंत दरमहा ५ जीबी अतिरिक्त डाटा मिळणार आहे. 

टॅग्स :Mobileमोबाइल