शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

अमेझॉनवर ऑनर ७ एक्सच्या नोंदणीस प्रारंभ

By शेखर पाटील | Updated: November 20, 2017 15:00 IST

ड्युअल कॅमेरा सेटअप असणारा ऑनर ७ एक्स हा स्मार्टफोन लवकरच भारतीय ग्राहकांना मिळणार असून याची अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून अगावू नोंदणी सुरू झाली आहे.

ठळक मुद्देहुआवे कंपनीच्या मालकीच्या ऑनर या ब्रँडने अलीकडेच चीनमध्ये ऑनर ७ एक्स हा स्मार्टफोन लाँच केला आहेयेत्या काही दिवसांमध्ये हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात येणार आहेस्मार्टफोनचे मूल्य जाहीर करण्यात आले नसले तरी ती २० हजारांच्या आसपास असेल असे मानले जात आहे

ड्युअल कॅमेरा सेटअप असणारा ऑनर ७ एक्स हा स्मार्टफोन लवकरच भारतीय ग्राहकांना मिळणार असून याची अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून अगावू नोंदणी सुरू झाली आहे.

हुआवे कंपनीच्या मालकीच्या ऑनर या ब्रँडने अलीकडेच चीनमध्ये ऑनर ७ एक्स हा स्मार्टफोन लाँच केला आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमिवर, अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून याची अ‍ॅडव्हान्स बुकींग सुरू झाली आहे. यासोबत अमेझॉनने काही ऑफर्सदेखील देऊ केल्या आहेत. यात अगावू नोंदणी ग्राहकांना या मॉडेलसोबत इयरफोन व पॉवरबँक देण्यात येणार आहे. तर यात्रा.कॉम या पोर्टलतर्फे लकी ड्रॉ काढण्यात येणार असून यातील विजेत्यांना सुमारे ७५ हजारांपर्यंतचे बक्षीस देण्यात येणार आहे. ऑनर ७ एक्स या स्मार्टफोनचे मूल्य जाहीर करण्यात आले नसले तरी ती २० हजारांच्या आसपास असेल असे मानले जात आहे. अर्थात हा मध्यम किंमतपट्टयातील स्मार्टफोन असेल.

ऑनर ७ एक्स या मॉडेलमध्ये १८:७ अस्पेक्ट रेशोयुक्त ५.९३ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १२८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा २.५ डी डिस्प्ले असेल. ऑक्टा-कोअर किरीन ६५९ प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेजसाठी ३२/६४ जीबी असे दोन पर्याय असतील. या दोन्ही व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविता येणार आहे. वर नमूद केल्यानुसार ऑनर ७ एक्स मॉडेलमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. यातील मागील बाजूस १६ व २ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे.  हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर आधारित इएमयुआय ५.१ या ऑपरेटींग सिस्टीमवर चालणारा असेल. तर यात ३३४० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे.

टॅग्स :huaweiहुआवेMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान