शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

हेरगिरी करणारे 20 अॅप्स प्ले स्टोअरवरून गुगलने केले डिलीट 

By sagar.sirsat | Updated: July 28, 2017 16:15 IST

गुगलकडून प्ले स्टोअरवर असलेले 20 अॅप्लिकेशन्स हटवण्यात आले आहेत. हे अॅप्लिकेशन्स युझर्सची हेरगिरी करताना आढळल्याने प्ले स्टोअरवरून डिलीट करण्यात आले

ठळक मुद्देहे अॅप्लिकेशन्स युझर्सची हेरगिरी करताना आढळल्याने प्ले स्टोअरवरून डिलीट करण्यात आले आहेत. हे अॅप्स जीमेल, हॅंगआउट, मेसेंजर यासारख्या अॅप्समधून माहिती गोळा करत होते. याशिवाय व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि व्हायबर यासारख्या अॅप्सच्या मेसेजवरही लक्ष ठेवलं जायचं.

मुंबई, दि. 28 - गुगलकडून प्ले स्टोअरवर असलेले 20 अॅप्लिकेशन्स हटवण्यात आले आहेत. हे अॅप्लिकेशन्स युझर्सची हेरगिरी करताना आढळल्याने प्ले स्टोअरवरून डिलीट करण्यात आले आहेत. युझर्सचे  ई-मेल, टेक्स्ट मेसेज, व्हॉइस कॉल्स, लोकेशन आदी गोष्टींवर हे अॅप्स नजर ठेवून असायचे त्यामुळे ते डिलीट करण्यात आल्याचं गुगलकडून सांगण्यात आलं आहे. या 20 अॅप्सचे डेव्हलपर्स आणि अॅप्सला अॅन्ड्रॉइड ईकोससिस्टीमद्वारे ब्लॉक करण्यात आलं आहे. या अॅप्समध्ये लिपिज्जा नावाचा एक स्पायवेअर होता. हा स्पायवेअर जुनं अॅंड्रॉइड व्हर्जन असलेल्या फोनचं सिक्युरिटी प्रोटेक्शन तोडायचा. त्यानंतर युझर्सची खासगी व संवेदनशील माहिती गोळा केली जायची. हे अॅप्स जीमेल, हॅंगआउट, मेसेंजर यासारख्या अॅप्समधून माहिती गोळा करत होते. याशिवाय व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि व्हायबर यासारख्या अॅप्सच्या मेसेजवरही लक्ष ठेवलं जायचं. सुरूवातीला गुगलने असे अॅप्स ब्लॉक केले होते, मात्र थोड्याच दिवसांनंतर काहीसा बदल करून हे अॅप्स प्ले स्टोरवर परतले. याबाबत गुगलने एक ब्लॉग पोस्ट केला आहे. या अॅप्लिकेशन्समध्ये काही कोड्स होते ज्याद्वारे काही महत्वाचे फंक्शन्स वापरले जायचे.खालील फंक्शन्स वापरले जायचे-- कॉल रेकॉर्डिंग- VoIP रेकॉर्डिंग- लोकेशन मॉनिटरिंग- स्क्रीनशॉट्स- फोनच्या  कॅमे-याने फोटो घेणे - डिव्हाइसची इन्फॉर्मेशन आणि फाइल्स अॅक्सेस करणं- कॉन्टॅक्ट्स, कॉल लॉग, एसएमएस, अॅपचा डेटा अॅक्सेस करणं- डिव्हाइस माइक रेकॉर्डिंग

काय आहे लिपिज्जा स्पायवेअर- लिपिज्जा हा एक मल्टि-स्टेज स्पायवेअर आहे, हा युझर्सच्या ईमेलमध्ये थेट शिरकाव करतो. त्यांचे मेसेज, लोकेशन, व्हॉइस कॉल्स आणि मीडिया अॅक्सेस करतो.

गुगल प्ले प्रोटेक्टमध्ये स्पायवेअर ओळखण्याची आणि पकडण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे असं कंपनीने सांगितलं. याशिवाय युझर्सच्या सुरक्षेसाठी काही सल्लेही देण्यात आलेले आहेत.  गुगलकडून देण्यात आलेले सल्ले- - तुम्ही गुगल प्ले प्रोटेक्टचा हिस्सा असल्याची खात्री करा- अॅप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरचाच वापर करा- अननोन सोर्सेसचा वापर करत नसाल तर ते डिसेबल ठेवा- तुमच्या फोनमध्ये लेटेस्ट अॅंड्रॉइड सिक्युरिटी अपडेट नक्की ठेवा.