शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

‘झेडपी’च्या तिजोरीत २४७ कोटी शिल्लक

By admin | Updated: July 16, 2014 00:49 IST

ढिम्म कारभार : एप्रिलपासून तीन महिन्यांत केवळ ११ टक्के खर्च

 सोलापूर: एकीकडे निधी नाही म्हणून बोंब तर दुसरीकडे निधी असताना तो खर्चला जात नाही, फायलींवर निर्णय लवकर होत नाही म्हणून बोंब़ अशा अवस्थेत झेडपीचा गाडा अडकल्यामुळे सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेच्या १२ विभागांमध्ये गतवर्षीचा आणि चालू वर्षाचा असा एकत्रित २४७ कोटी ३९ लाख ४३ हजार ६९७ रुपयांचा निधी शिल्लक असल्याची बाब पुढे आली आहे़ जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची मासिक बैठक सोमवारी पार पडली़ या समितीसमोर मुख्य लेखा व वित्त विभागाकडून (कॅफो) ही आकडेवारी देण्यात आली आहे़ जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सभेत आम्हाला जमा- खर्चाचा तपशील दिला जात नसल्याची ओरड काही सदस्य करतात, मात्र याकडे मोजकेच सदस्य बारकाईने लक्ष देऊन आपल्या भागात निधी पळवितात़ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रजेवर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे पद रिक्त आणि त्यातच पदाधिकाऱ्यांमध्ये नसलेला समन्वय याचा परिणाम जिल्ह्यातील विकास कामांवर होत आहे़ ‘रामभरोसे’ कारभार चालल्यामुळे ‘दादागिरी’ केल्याशिवाय झेडपीचे अधिकारी पळत नाहीत, असे चित्र आहे़ जिल्हा परिषदेचे स्वत:चे उत्पन्न (सेस) सध्या ३४ कोटींवर पोहोचले आहे़ जिल्हा नियोजन समितीमधून तसेच शासनाकडून त्या त्या विभागाला थेट अनुदान दिले जाते, त्यामुळे बालाजीच्या हुंडीमध्ये जसा निधी शिल्लक असतो तशी अवस्था झेडपीत दिसत आहे़ सन २०१३-१४ वर्षाचा २१० कोटी ५९ लाखांचा निधी शिल्लक आहे़ हा सोडून यंदाच्या वर्षी ११३ कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर झाला खरा परंतु प्रत्यक्षात ३६ कोटी ८० लाख प्राप्त झाले आहेत़ त्यामुळे गतवर्षीचा शिल्लक निधी आणि यंदा प्राप्त झालेला निधी विचारात घेता तिजोरीत सध्या २४७ कोटी शिल्लक आहेत़ विशेष म्हणजे अद्याप जिल्हा नियोजन समितीकडून एक रुपया देखील निधी मिळाला नाही तरी एवढा निधी शिल्लक आहे़ नियोजन समितीमधून १११ कोटी मिळणार आहेत़ त्यामुळे करोडो रुपयांचा निधी असताना खर्चाची आकडेवारी मात्र नगण्य असल्याचे दिसते़ ---------------------------विविध विभागांचा शिल्लक निधीजिल्हा प्रशासन (ग्रामपंचायत)- ४१़२५ कोटीशिक्षण विभाग (प्राथमिक) - ३०़८६ कोटीशिक्षण विभाग (माध्यमिक) - ५़४७ लाखबांधकाम विभाग - ३७़ ८६ कोटीलघुपाटबंधारे विभाग- २१़१८ कोटीआरोग्य विभाग-१३़३५ कोटी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग-१७़२६ कोटी शेती विभाग-८़४० कोटीपशुसंवर्धन विभाग-१०़३९ कोटीसमाजकल्याण व अपंग कल्याण विभाग-४७़२६ कोटीमहिला व बालकल्याण विभाग-१४़६७ कोटी एकूण शिल्लक निधी - २४७ कोटी ३९ लाख ४३ हजार ६९७---------------------------------योजनानिहाय शिल्लक निधी जिल्हा वार्षिक योजना (हस्तांतरण)-८५़७३ कोटीजिल्हा वार्षिक योजना (अभिसरण)-११़९५ कोटीशासन योजना (हस्तांतरण)-९६़९९ कोटीशासन योजना (अभिसरण)-१८़०५ कोटीजिल्हा परिषद (सेस)-३४़६५ कोटी एप्रिल ते जून खर्च- २६़८७ कोटी -----------------------जिल्हा परिषदेच्या तिजोरीत सन २०१३-१४ या आर्थिक वर्षामधील २१० कोटी ५८ लाख शिल्लक आहेत़ सन २०१४-१५ साठी ११३ कोटी मंजूर झाले असून, प्रत्यक्षात ३६ कोटी ८० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे, त्यामुळे सध्या जि़प़च्या विविध योजनांसाठी तरतूद असलेला २४७ कोटींचा निधी जि़प़च्या तिजोरीत आहे़- गौतम जगदाळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जि़प़ सोलापूर