शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?
2
...नाहीतर भारत-पाकिस्तानमध्ये अण्वस्त्र युद्ध झालं असतं; डोनाल्ड ट्रम्प यांचा स्फोटक दावा
3
Video: प्रतीक्षा संपली, इलॉन मस्क यांची भारतात एन्ट्री! असं आहे Tesla चं मुंबईतील पहिलं शोरुम
4
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
5
Stock Market Today: २० अंकांनी घसरुन उघडला सेन्सेक्स; फार्मा आणि मेटल क्षेत्रात खरेदी, थोड्याच वेळात का आली तेजी?
6
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
7
क्रूरतेचा कळस! सैनिकाचे पोट फाडून त्यात ठेवला बॉम्ब; नक्षलवादी योगेंद्र कसा पकडला गेला?
8
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
9
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
10
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
11
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
12
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
13
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
14
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
15
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
16
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
17
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
18
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
19
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
20
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना

यंदा पाऊस ५० टक्क्यांनी कमी

By admin | Updated: July 30, 2014 01:25 IST

सरासरीही गाठेना : महिनाभरापासून रिकामे ढग

सोलापूर : काहीकेल्या पावसाची आकडेवारी पुढे सरकेना झाली असून, मागील वर्षीच्या ५० टक्केही पाऊस आजअखेर पडलेला नाही. सोलापूर जिल्ह्यात पाऊस नसल्याने पाण्याची पातळी वाढलेली नाही.पावसाळ्याची पाच नक्षत्रे निघून गेली असून, एकाही नक्षत्राचा सर्वदूर पाऊस सोलापूर जिल्ह्यात झालेला नाही. एकेका भागात पाऊस पडत असल्याने काही भागांचे समाधान झाले आहे. मात्र तलाव, नद्या, नाले भरण्यासारखा पाऊस अद्याप झालेला नाही. २०११ व २०१२ ही दोन वर्षे पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. मागील वर्षी पुणे जिल्ह्यात जून व जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने जुलैमध्ये उजनी धरणातून कॅनॉल व नदीतून पाणी सोडले होते. वजा ५० टक्के इतकी कमी झालेली पाण्याची पातळी २९ टक्के प्लसमध्ये आली होती. याशिवाय उजनीचे पाणी सोडल्याने कॅनॉललगतचे तलाव व बंधारे पाण्याने भरुन घेतले होते. यावर्षी पाऊस काहीकेल्या पडेना झाल्याने उजनी धरणासह जिल्ह्यातील तलाव कोरडेच आहेत. जून व जुलै महिन्यात एकूण २२३३.९ तर सरासरी २०३.०८ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित असताना यावर्षी एकूण १३०४.४७ मि.मी. तर सरासरी ११८.५९ मि.मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी प्रत्यक्षात एकूण २५९४ मि.मी. पाऊस पडला होता. तुलनेत यावर्षी ५० टक्के पाऊस कमी झाला आहे. --------------------------यावर्षी २७ जुलैपर्यंत पडलेला पाऊसउत्तर सोलापूर- १२४ मि.मी., दक्षिण सोलापूर-११८ मि.मी., बार्शी-११२ मि.मी.,अक्कलकोट-१०४ मि.मी., पंढरपूर-९२ मि.मी., मंगळवेढा- ११८ मि.मी., सांगोला-१९२ मि.मी., माढा-९५ मि.मी., मोहोळ-१२५ मि.मी., करमाळा-१४४ मि.मी., माळशिरस-८१ मि.मी. एकूण पाऊस १३०४ मि.मी. सरासरी पाऊस ११८.५९ मि.मी.------------------------------------------मागील वर्षी २७ जुलैपर्यंत पडलेला पाऊस उत्तर सोलापूर- ३०५ मि.मी., दक्षिण सोलापूर-२२६ मि.मी., बार्शी-२७७ मि.मी.,अक्कलकोट-२६८ मि.मी., पंढरपूर-२३२ मि.मी., मंगळवेढा- १४९ मि.मी., सांगोला-१३७ मि.मी., माढा-३१९ मि.मी., मोहोळ-२४२ मि.मी., करमाळा-२२२ मि.मी., माळशिरस-२१७ मि.मी. एकूण पाऊस-२५९४ मि.मी., सरासरी पाऊस २३५.८५ मि.मी.