शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पंढरीत वारकऱ्यांना फटका

By admin | Updated: July 13, 2014 01:32 IST

रेल्वे कर्मचाऱ्यांचे अज्ञान; तिकीट मागितले एका गावचे दिले दुसरीकडचे

पंढरपूर : पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेल्या हजारो भाविकांनी घरी परतत असताना रेल्वेने जाणे पसंत केले आहे, परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अज्ञानामुळे अनेक भाविकांना स्वत:च्या गावाऐवजी दुसऱ्याच गावचे तिकीट दिल्याने नाहक आर्थिक तसेच मानसिक भुर्दंड मोठ्या प्रमाणात सहन करावा लागला.गुरूवारी आषाढी एकादशी असल्याने त्या दिवशी चंद्रभागेत पवित्र स्नान करून विठ्ठल-रूक्मिणीचे दर्शन घेतले. गुरूवारी सकाळपासूनच रेल्वे स्थानकावर हजारो भाविकांनी गर्दी केली होती. तिकीट खिडकीमध्ये तिकीट विक्रीचे काम करण्यासाठी नवीन कर्मचारी असल्याने त्यांना प्रत्येक गाड्यांचे क्रमांक माहीत नव्हते. यामुळे अनेक भाविकांना ज्या ठिकाणी जायचे आहे, त्या ठिकाणच्या पुढच्या गावाचे तिकीट वाटण्यात येत होते. यामुळे अनेक भाविकांना विनाकारण जादा खर्चाचा भुर्दंड सोसावा लागत होता.असाच प्रकार दीपक उखरूड महाजन, मनोज प्रभाकर महाजन, अनिता दीपक महाजन, द्वारकाबाई नामदेव चौधरी, तुळशीदास चंद्रकांत चौधरी, योगिता तुळशीदास चौधरी, अनिल केशव चौधरी व मंगला अनिल चौधरी (रा. सर्व वाघोड, ता. रावेर, जि. जळगाव) यांच्याबरोबर घडला. या सर्वांना बुऱ्हाणपूरपर्यंत जाण्याचे तिकीट हवे होते, परंतु त्यांना भुसावळपर्यंत तिकीट मिळेल म्हणून सांगण्यात आले. त्यांनी पर्याय नसल्याने तिकीट विकत घेतले. परंतु त्यांच्या समोरच काही भाविकांना त्यांना हवे असलेले गावापर्यंतचे तिकीट दिले. यामुळे महाजन कुटुंबीयांनी परत तिकीट बदलून मागितले, परंतु तिकीट विक्री करणाऱ्यांनी त्यांना दमदाटी करून माघारी पाठविले.संतप्त भाविकांनी पंढरपूर येथील रेल्वेचे मुख्य वाणिज्य अधिकारी एम. के. गोसावी यांच्याकडे दाद मागितली असता त्यांच्याकडेही त्यांना न्याय मिळाला नाही. यामुळे त्यांनी आषाढी यात्रेनिमित्त रेल्वे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आलेल्या उपविभागीय वाणिज्य व्यवस्थापक ए. एस. रिसभूड यांच्याकडे धाव घेतली. ए. एस. रिसभूड यांनी महाजन यांना तिकीट विक्री केंद्रात त्या तिकीट विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे नेऊन तिकीट रद्द करून दुसरे तिकीट दिले. सर्व तिकीट विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांना असा प्रकार करू नका, असा आदेश दिला.