शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलाच्या उत्पन्नात चौपट वाढ

By admin | Updated: July 12, 2014 00:15 IST

बडवे-उत्पातांशिवाय पहिलीच वारी: गर्दी कमी असूनही वाढले दान

पंढरपूर: पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बडवेमुक्त झाल्यामुळे मंदिर समितीच्या उत्पन्नामध्ये गतवर्षीपेक्षा यंदा चौपट वाढ झाली असून यंदा १८ लाख ७६ हजार ३५८ रूपयांचे दान विठ्ठल-रूक्मिणीच्या पायावर गोळा झाले आहे. गतवर्षी ६ लाख ४५ हजार २०० रूपये गोळा झाले होते. प्रत्येक वर्षी आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रमुख पालख्यांबरोबर लाखो भाविक पंढरीत दाखल होत असतात, हे सर्वांनाच माहिती आहे. यामुळे पंढरपूर शहराबरोबरच इतर गावातील व्यापारी माल खरेदी लवकर येतात. यंदाच्या वर्षीही असाच प्रकार घडला. परंतु आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रमुख पालख्यांसह भाविकांची गर्दी कमी असल्याचे जाणवत होते. यामुळे सर्व चिंतीत पडले. दशमीच्या दिवशी सकाळी काहीच गर्दी नव्हती. परंतु त्याच दिवशी सायंकाळी भाविकांची गर्दी वाढली. एकादशीदिवशी पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गावरच जादा गर्दी होती. त्यानंतर द्वादशीदिवशी पंढरपूर मोकळे झाले. यामुळे व्यापाऱ्यांना अपेक्षीत असा व्यवसाय झाला नाही.असे असले तरी विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नावर याचा काहीच परिणाम जाणवला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बडवे-उत्पातांना मंदिरातून बाहेर काढल्याने विठ्ठल-रूक्मिणीच्या पायावर थेट पडणारी रक्कम मंदिर समितीच्या उत्पन्नात जमा झाली आहे.यामुळे यंदाच्या वर्षी गतवर्षीच्या तुलनेने मंदिर समितीला जादा उत्पन्न मिळाले आहे. गेल्यावर्षी आषाढ पंधरवड्यात विठ्ठल-रूक्मिणीच्या पायावरील दानासाठी बडवे-उत्पातांनी ६ लाख ३२ हजार २०० रूपयांना लिलाव घेतला होता. यामुळे एवढीच रक्कम मंदिर समितीला मिळाली होती. परंतु यंदाच्या वर्षी विठ्ठल-रूक्मिणीच्या पायावरील दान थेट मंदिर समितीला मिळाले आहे. यामुळे मंदिर समितीला २० लाख २७ हजार ३५८ रूपये उत्पन्न मिळाले.--------------------बडवे-उत्पातांविना पहिलीच वारीउच्च न्यायालयाच्या आदेशान्वये यंदाच्या वर्षी बडवे-उत्पात मुक्त आषाढी झाली आहे. या आषाढीमध्ये दोन्ही समाजाकडून आणल्या जात असलेल्या यजमानांचा त्रास भाविकांना सहन करावा लागला नाही. त्याचबरोबर विठ्ठल-रूक्मिणीच्या पायावरील बडवे-उत्पात मंडळींकडून मागण्यात येणारी दक्षिणा बंद झाल्याने दर्शनरांग सुरळीत व व्यवस्थित पुढे जात होती असे सांगण्यात आले़------------------यंदाच्या वर्षी दुष्काळामुळे भाविकांच्या संख्येत घट असली तरी मंदिर समितीच्या उत्पन्नात काहीही फरक जाणवला नसून याउलट मंदिर समितीला जास्तच उत्पन्न मिळाले आहे.- संजय तेली कार्यकारी अधिकारी,विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समिती