शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

दौंडमधून विसर्ग कमी झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:27 IST

भीमानगर : पुणे जिल्ह्यातील धरण पट्ट्यातील पाऊस बंद झाल्याने दौंडमधून उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे गुरुवारी ...

भीमानगर : पुणे जिल्ह्यातील धरण पट्ट्यातील पाऊस बंद झाल्याने दौंडमधून उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभरात धरणात केवळ एक टक्का पाण्याची पातळी वाढली असून आता धरण ८१ टक्के भरले आहे.

पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले उजनी धरण हे आता पुणे जिल्ह्यातील धरणावरच भरत आहे. चालू वर्षी उजनी जलाशयावर ३८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत अतिशय कमी आहे. गेल्या वर्षी उजनी धरणावर एक हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. पावसाळा संपायला काही दिवस शिल्लक असताना अद्यापही उजनीवर पाहिजे तसा दमदार पाऊस झालाच नाही.

पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के भरली असून ओव्हरफ्लो पाणी सोडून दिले जात असल्याने उजनीची टक्केवारी वाढत आहे. सद्य परिस्थिती पाहता असाच फ्लो येत राहिला तर उजनी ९० टक्केचा पल्ला गाठेल.

दरम्यान, बुधवारच्या तुलनेत गुरुवारी बंडगार्डन व दौंडचा विसर्ग निम्म्यावर आला आहे. कारण पुणे जिल्ह्यातील धरण साखळीमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. गुरुवारी दिवसभरात तीन टक्क्यांनी पाणीवाढ झाली आहे.

................

उजनी सद्य:स्थिती

एकूण पाणीपातळी ४९५.९०० मीटर

एकूण पाणीसाठा ३०१९.८७ दलघमी १०६ टीएमसी

उपयुक्त पाणीसाठा १२१७.०६ दलघमी ४३ टीएमसी

टक्केवारी ८१ टक्के

........

उजनीत येणारा विसर्ग

दौंड ८११६

बंडगार्डन ५०००

.........

उजनीतून जाणारा विसर्ग

सीनामाढा २२२

दहिगाव ८४

बोगदा १५०