शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चिठ्ठीद्वारे बिनविरोध सदस्याला लागली सरपंचाची लाॅटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST

उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्त्यांना राजकारणात पोळले आहे. गावात भांडणतंटे करुन पोलीस स्टेशन व न्यायालयाच्या पायऱ्या झिजवून कार्यकर्ते ...

उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्त्यांना राजकारणात पोळले आहे. गावात भांडणतंटे करुन पोलीस स्टेशन व न्यायालयाच्या पायऱ्या झिजवून कार्यकर्ते आर्थिक अडचणीत आले आहेत. अनेक वर्षांपासूनचा कटू अनुभव लक्षात घेता अनेक गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न झाले. त्यामध्ये पडसाळीचाही समावेश आहे. शेतीसाठी विजेचा पुरवठा पुरेशा दाबाने होत नसल्याची येथील प्रमुख समस्या. या विषयावर संपूर्ण गाव एकत्र आला अन् संपूर्ण ९ सदस्य अविरोध करण्याचा निर्णय झाला.

मात्र अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी दोघे इच्छुक होते. दोघेही सामंजस्य असल्याने चिठ्ठीद्वारे एकाचे नाव अंतिम करण्यासाठी एकमत झाले. समाधान रोकडे व धर्मा रोकडे यांच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यात धर्मा रोकडे यांच्या नशिबी सदस्यपद होते. एकच जागा असल्याने धर्मा रोकडे बिनविरोध सदस्य झाले. बुधवारी झालेल्या आरक्षण सोडतीत पडसाळी गावचे सरपंच पद अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने धर्मा रोकडे यांच्या सरपंचपदावर शिक्कामोर्तब झाले.

-----

असाच प्रकार साखरेवाडीच्या हिराबाई भागवत सुतार यांच्याबाबत झाला आहे. साखरेवाडी गावही निवडणुकीवेळी गटबाजीतुन

होणार्या भांडणाला वैतागले आहे. म्हणून गावकर्यांनी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. त्यात हिराबाई सुतार बिनविरोध सदस्य झाल्या व बुधवारी निघालेल्या आरक्षणात सरपंचपदाची संधी मिळाली आहे.