मुंबई येथील रहिवाशी स्वप्निल वसंत चव्हाण यांनी मुळगाव सोनंद येथील शेतातील बंगला राखण्यासाठी गावातील मुबारक उस्मान शेख यास सालगडी म्हणून कामास ठेवले आहे. दरम्यान, ७ जुलै रोजी सकाळी ८.३०च्या सुमारास मुबारक शेख फोनवरून स्वप्निल चव्हाण यांना घरास लावलेले कुलूप कोयंडा तुटल्याने तेथेच पडला आहे व आतील बाजूस बेडरूममधील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने ठेवलेला डबा बेडवर पडलेला असा निरोप दिला. सुनील चव्हाण यांनी सोनंद येथे येऊन बेडरूममधील कपाटाची तपासणी केली असता १५ हजार रुपये किमतीचे ५.५ ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या, कानातील रिंगा दागिन्यासह दहा हजार रुपये किमतीची २० भार चांदीचा गणपती, करंड, पैंजण, मनगट्या असा सुमारे २५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
अज्ञात चोरट्याने २५ हजारांचे दागिने लंपास केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:16 IST