शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

By admin | Updated: January 3, 2017 20:14 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील मोहोळचे उपकार्यकारी अभियंता विकास पानसरे यांच्या आत्महत्या प्रकरणी सोलापूर मंडलचे अधीक्षक अभियंता

 ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 3 -   महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील मोहोळचे उपकार्यकारी अभियंता विकास पानसरे यांच्या आत्महत्या प्रकरणी सोलापूर मंडलचे अधीक्षक अभियंता धनंजय औँढेकर व सोलापुर ग्रामीण चे कार्यकारी अभियंता बालाजी डुमने या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच या दोन अधिकाऱ्यांची महावितरणने दोघांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी ज्ञानदेव पडळकर यांची सोलापूर महावितरणचे नवे अधिक्षक अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २९ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजनेच्या पूर्वी मोहोळ येथील राहत्या घरी विकास पंढरीनाथ पानसरे ( वय -४२) यांनी टॉवेलच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याबाबत मयत पानसरे यांच्या पत्नी अनिता पानसरे रा. पुणे यांनी त्याच दिवशी वरिष्ठ अधिकारी डुमने व पानसरे यांच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा लेखी जबाब दिला होता. त्यानुसार मोहोळ पोलिस ठाण्याचे पो. उपनिरीक्षक नजीर खान यांनी प्रथम तपास केला. मयताचे चौकशी मध्ये अनीता पानसरे यांनी दि. ३ जानेवारी २०१७ रोजी फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार बालाजी डुमने व धनंजय औंढेकर या दोन अधिकाऱ्यांनी संगनमताने विकास पानसरे यांना नोकरीवर असताना वेळोवेळी अपमानस्पद वागणूक देवून, लोकांचे समोर अपमानास्पद बोलून, कामाचे व्यतिरिक्त अन्य त्रास देत असल्याने तसेच दि २७ व २८ डिसें रोजी पानसरे यांना रजेवरुन नोकरीवर हजर करुन न घेता, दोघांनी आणखी मानसिक त्रास दिला. आॅफिस बाहेर थांबवून त्यांचे वरिष्ठ चीफ इंजिनीअर नागनाथ इरवाडकर यांनी हजर करुन घेण्यास सांगून देखील डुमने व औंढेकर यांनी त्यांना हजर करुन घेतले नाही. विकास पानसरे यांना वरील दोन अधिकाऱ्यांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे,आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याचे सांगितल्याने त्यांच्यासमोर आत्महत्या शिवाय पर्याय नसल्याने, जीवनास कंटाळूनच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्या करण्यास या दोन अधिका?्यांनी प्रवृत्त केले आहे. अशी फिर्याद मयताच्या पत्नी अनीता पानसरे यांनी मोहोळ पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार डुमने व औंढेकर यांच्यावर भादवि ३०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपाधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पो. नि.राजेंद्र मस्के करीत आहेत.