शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गौडगावात दोन गटात मारहाण

By admin | Updated: July 12, 2014 00:09 IST

दंगा काबू पथक तैनात: ३६ जणांवर परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

गौडगाव : बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे गुरुवारी दोन गटात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली; मात्र शुक्रवारी दोन्ही गटांच्या एकूण ३६ जणांवर वैराग पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.शुक्रवारी गावातील सर्व व्यवहार बंद होते़ अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगा काबू पथक तैनात करण्यात आले आहे़सविस्तर वृत्त असे की, १० जुलै रोजी स्वप्निल भोंग हा शेताकडे जात असताना पारधी समाजाचे परमेश्वर शिंदे यांच्या घरासमोर फावडे दिसले़ ते आमचे आहे म्हणताच शिंदे याने स्वप्निल यास मारहाण केली़ स्वप्निलने वडील माधव भोंग यांना परमेश्वर शिंदे याने मारहाण केल्याचे सांगितले़ त्यानंतर गावातील २५ ते ३० तरुणांना याची माहिती देण्यात आली़ या तरुणांनी परमेश्वर शिंदे यांना मारहाण केली़ परमेश्वर शिंदे हा शुक्रवारी सकाळी वैराग पोलीस ठाण्यास जाऊन ३२ जणांविरोधात मारहाण, घराची तोडफोड व मोटरसायकलचे नुकसान केल्याची तक्रार दिली़ त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला़ त्यामध्ये माधव भोंग, नाना भोंग, हिराचंद शिंदे, नामदेव शिंदे, मदन आरगडे, स्वप्निल भोंग, विशाल भोसले, भैय्या भोसले, रमेश ठाकर, नाना काकडे, विजय काजळे, सागर भड, वैजिनाथ काजळे, विनोद काजळे, कल्याण भड, रामा काजळे, नाना यादव, नितीन काकडे, दत्तात्रय काकडे, पवन काजळे, पवन लोट, दत्तात्रय काकडे, राजाभाऊ चव्हाण अमोल भोसले, नागनाथ मगर, नाना कापसे, शिवाजी लांडगे, पांडू ढमे, गणेश मगर, खुदबुद्दीन शेख, मिटू यादव, अनिल आरगडे यांचा समावेश आहे़ ३२ जणांवर गुन्हा दाखल झाल्याने शुक्रवारी सकाळी गावातील एका गटाचे जवळपास ८०० नागरिक एकत्र जमले़ यावेळी बार्शीहून आलेले उपविभागीय अधिकारी ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत शिंदे, दत्तात्रय कदम यांच्याशी चर्चा केली; मात्र पारधी समाजाचा एकही प्रतिनिधी तेथे उपस्थित नव्हता़ गौडगावमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगा काबू पथक व स्ट्रायकिंग पथक तैनात करण्यात आले़ ------------------------गावातील व्यावहार बंदचर्चेनंतर माधव भोंग यांनीही रवी शिंदे, विकास शिंदे, नंदू शिंदे, परमेश्वर शिंदे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला़ दोन्ही गटातील एकूण ३६ जणांवर वैराग पोलिसांत गुन्हे दाखल झाले.गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने सर्व व्यवहार शुक्रवारी बंद होते़