शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमधून तिघे बडतर्फ

By admin | Updated: September 4, 2014 01:00 IST

तौफिक शेख, अल्लोळी, सय्यद यांचा समावेश

सोलापूर : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष तौफिक शेख, मनपा परिवहनचे माजी सभापती इम्तियाज अल्लोळी, सदस्य कोमारो सय्यद यांना काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात राहून पक्ष विरोधात बैठका घेणे व इतर पक्षांकडे उमेदवारी मागणे याबाबतच्या तक्रारी वाढल्यामुळे ही कारवाई केल्याचे यलगुलवार यांनी स्पष्ट केले. मनपातील सभागृह नेते महेश कोठे व माजी महापौर नलिनी चंदेले यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना व भाजपात प्रवेश केला. प्रदेश अध्यक्षांकडे याबाबत अहवाल पाठवून या दोघांना यापूर्वीच बडतर्फ करण्यात आले आहे. तौफिक शेख यांनी शहर मध्यमध्ये उमेदवारीची मागणी केली. तत्पूर्वीच त्यांनी पक्षविरोधात बैठका घेतल्या. इतर पक्षांकडे उमेदवारीची मागणी केली व अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला. अशीच तक्रार अल्लोळी व सय्यद यांच्याबाबतीत आल्यावर ही कारवाई करण्यात आली. ६ सप्टेंबर रोजी महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक आहे. महापालिकेत काँग्रेसचे ४४ तर राष्ट्रवादीचे १६ सदस्य आहेत. कोठे यांच्या फुटीचा या निवडणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून काँग्रेसने खबरदारी घेतली आहे. सर्व नगरसेवकांना संपर्कात राहण्याची सूचना करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांना सदस्य सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. देवेंद्र कोठे यांनी पक्षाचा व्हीप मंगळवारी उशिरापर्यंत स्वीकारलेला नव्हता तर नाराज सदस्यांच्या संपर्कात महेश कोठे असल्याचे सांगण्यात आले.