शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अपघात रोखण्यासाठी केला जातोय सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST

देशात व महाराष्ट्रात अपघातांमुळे वर्षाकाठी हजारो नागरिकांचे नाहक जीव बळी जात आहेत. मृत्यूच्या व जखमींच्या आकड्यात दिवसेंदिवस भर पडत ...

देशात व महाराष्ट्रात अपघातांमुळे वर्षाकाठी हजारो नागरिकांचे नाहक जीव बळी जात आहेत. मृत्यूच्या व जखमींच्या आकड्यात दिवसेंदिवस भर पडत असल्याने एका सामाजिक कार्यकर्त्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन सुप्रीम कोर्टाने प्रत्येक जिल्ह्यात अपघाताचा सर्व्हे करण्याचे निर्देश दिले आहेत.

यानुसार सोलापूर जिल्ह्यात सन २०१७ ते २०१९ दरम्यान झालेल्या अपघातस्थळांचा सर्व्हे जिल्हा ग्रामीणच्या पोलीस अधीक्षिका तेजस्वी सातपुते व अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस हवालदार डिंगरे, येळनोरे, पोलीस शिपाई शिवाजी सोनवले यांच्या पथकाने मंगळवारी सोलापूर ते उजनी (भीमानगर) या दरम्यान असलेल्या २८ अपघातस्थळांची तर बुधवारी सोलापूर-कोल्हापूर महामार्गावरील सोलापूर ते सांगोला ७ ब्लॅक स्पॉट ठिकाणांचा सर्व्हे केला.

अपघातग्रस्त ठिकाणे

करमाळा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५६१ वरील देवळाली, मांगी पुलाचे वळण, मोहोळ राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वरील सावळेश्‍वर दर्गा, अर्जुनसोंड फाटा, लांबोटी, चंदननगर, वडवळ फाटा, कन्या प्रशाला चौक, नरखेड क्रॉस रोड, कचरे पेट्रोल पंप, यावली क्रॉस रोड, अनगर फाटा, चिखली टॉवर, हिवरे फाटा, तेलंगवाडी, शेटफळ-माढा फाटा, मंगळवेढा राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वरील कचरेवाडी फाटा, आंधळगाव, मंगळवेढा शहर बोराळे नाक्याजवळ, माचणूर ते ब्रह्मपुरी रोडवर, कामती महामार्ग क्र. ४६५ कोरवली चौक कॉर्नर, परमेश्‍वर पिंपरी ते कुरुल, वाघोली शिवार आदी ठिकाणांना या पथकाने भेट देऊन अपघातस्थळांची पाहणी करत तेथील नागरिकांची मते जाणून घेतली. अपघात रोखण्यासाठी अपघातस्थळी विविध सिम्बॉल व फलक लावून प्रयत्न केले जाणार असल्याचे पथकाने सांगितले.

ओळी :::::::::::::::

माचणूर येथे अपघातस्थळाची पाहणी करताना पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व इतर कर्मचारी.