शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष देशमुख गटाची पीछेहाट, सर्वपक्षीय आघाड्यांची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:24 IST

सोलापूर : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाची ग्रामपंचायत निवडणुकीत पीछेहाट झाली आहे. ...

सोलापूर : सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाची ग्रामपंचायत निवडणुकीत पीछेहाट झाली आहे. नऊ ग्रामपंचायतींवर भाजपची सत्ता आली असली तर तब्बल २५ ग्रामपंचायती त्यांना गमवाव्या लागल्या आहेत. सर्वपक्षीय आघाड्यांनी भाजपचा वारू रोखल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले.

तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सुभाष देशमुख यांच्या मतदार संघातील ३४ ग्रामपंचायतींचा समावेश होता. बाळगी ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर ३३ पैकी ९ ग्रामपंचायती भाजपला राखता आल्या. त्यात होटगी - सावतखेड, इंगळगी, हत्तरसंग, होटगी स्टेशन, औराद, यत्नाळ, कणबस (ग), कारकल, सादेपूर यांचा समावेश आहे. माळकवठे ग्रामपंचायतीतील पराभव भाजपसाठी धक्कादायक आहे.

भाजपची राज्यातून सत्ता गेल्याने सुभाष देशमुख यांचे मंत्रिपदही गेले. त्याचा फटका ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला बसला आहे. सत्ता गेल्याने भाजपचे कार्यकर्ते सैरभैर झाले असून, देशमुख यांचा गट विस्कळीत झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्ते भाजपकडून लढण्याऐवजी अन्य आघाड्यांमध्ये गेले. त्यामुळे भाजपच्या हातून अनेक ग्रामपंचायती निसटल्या. विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली. परंतु, पक्षीय पातळीवर त्याची मांडणी करण्यात नेते व कार्यकर्ते अपयशी ठरले.

-------

संपर्क तुटल्याचा फटका

सुभाष देशमुख यांची सेकंड इनिंग तशी नाराजीतूनच सुरू झाली. ग्रामीण भागातून त्यांचे मताधिक्य घटल्याने त्यांना आपली नाराजी लपवता आली नाही. याविषयी उघडपणे चर्चा सुरू झाली. त्यातून कोविड, अतिवृष्टी, महापूर या संकट काळात भीमा नदीच्या खोऱ्यात देशमुख यांच्याविरोधात सूर आळविण्याचे काम भाजपतूनच सुरू झाले. मतदार संघाशी सुभाष देशमुख यांचा संपर्क कमी झाला. पुत्र मनिष देशमुख यांच्यावर त्यांनी जबाबदारी दिली. परंतु, ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना फारसा प्रभाव टाकता आला नाही. याउलट माजी आमदार दिलीप माने यांनी संपर्क वाढवला. वडापूर, सादेपूर, गुंजेगाव , माळकवठे या ग्रामपंचायती माने गटांनी खेचून घेतल्या.

--------

सर्वपक्षीय आघाड्यांना पसंती

राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने कार्यकर्ते पक्षभेद विसरून सोयीनुसार एकत्र आले. अनेक ठिकाणी सर्वपक्षीय आघाडी करून निवडणुका लढविण्यात आल्या. या निवडणुकीत भाजपची दुसरी फळी कार्यरत नव्हती. कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेणारा आणि त्यांचे संघटन करणारा नेता नसल्याने भाजपऐवजी कार्यकर्त्यांनी स्वतंत्र आघाड्या करून निवडणूक लढणे पसंत केले.

---------

बिनविरोधसाठी प्रयत्न कमी पडले

मतदार संघात बाळगी ही एकमेव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. अक्कलकोट मतदार संघात समाविष्ट असलेल्या बोरामणी, संगदरी, तीर्थ, दिंडूर, लिंबीचिंचोळी या पाच ग्रामपंचायतींची निवडणूक स्थानिक पातळीवर बिनविरोध झाली. सुभाष देशमुख यांच्या मतदार संघात तसा प्रयत्न कोणत्याही राजकीय नेत्याने अथवा पक्षाने केल्याचे दिसून आले नाही.