शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

धक्कादायक ; टायर, झाडे, काटेरी झुडूपांच्या पेटलेल्या जाळातूनच नेली रूग्णवाहिका, सोलापूरातील घटना

By appasaheb.dilip.patil | Updated: July 30, 2018 14:56 IST

आप्पासाहेब पाटीलसोलापूर : दुपारी बाराची वेळ...मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मार्डी (ता़ उ़ सोलापूर ) येथे आंदोलन सुरू़...रस्त्यांवर टायर पेटवून वाहतुक अडविण्यात आली होती़...याच दरम्यान अत्यावस्थ रूग्णाला घेऊन जात असलेली एमएच १४ सीएल ०६३६ या क्रमाकांची एक रूग्णवाहिक तेथे आली़...पण याच रस्त्यांवर मोठया प्रमाणात टायर, झाडे, काटेरी झुडूपांच्या जळत असल्याने ...

ठळक मुद्दे- जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा समाजाचे आंदोलन सुरू- मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांनी केली मोलाची मदत- रूग्णास वेळेवर उपचार करण्यास १०८ ने पोहोचविले

आप्पासाहेब पाटीलसोलापूर : दुपारी बाराची वेळ...मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मार्डी (ता़ उ़ सोलापूर) येथे आंदोलन सुरू़...रस्त्यांवर टायर पेटवून वाहतुक अडविण्यात आली होती़...याच दरम्यान अत्यावस्थ रूग्णाला घेऊन जात असलेली एमएच १४ सीएल ०६३६ या क्रमाकांची एक रूग्णवाहिक तेथे आली़...पण याच रस्त्यांवर मोठया प्रमाणात टायर, झाडे, काटेरी झुडूपांच्या जळत असल्याने चालकाला रूग्णालयास जाण्यासाठी मार्गच नव्हता़...अशावेळी चालकाने जीव धोक्यात घालून त्या पेटत असलेल्या जाळ्यातूनच रूग्णवाहिका नेली अन अत्यावस्थ रूग्णाला वेळेत रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सोमवारी बंदची हाक दिली होती़ त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात व गावात बंद पाळण्यात आला़ याचवेळी शासनाचा निषेध करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यांवर टायर पेटवून वाहतुक अडविली होती़ दरम्यान, उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी या गावात मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी मार्डी - तुळजापूर व मार्डी - सोलापूर या मार्गावर टायर पेटवून रस्ता अडविला होता़ याचवेळी दुपारी एकच्या सुमारास या मार्गावरून अत्यवस्थ रूग्ण घेऊन जात असलेली एमएच १४ सीएल ०६३६ या क्रमाकांची रूग्णवाहिका आली़ मात्र रस्त्यांवर मोठया प्रमाणात टायर पेटत असल्याने तेथुन मार्ग काढणे कठीणच होते़ मात्र रूग्णवाहिकेच्या चालकाने जीव धोक्यात ती रूग्णवाहिका चक्क जाळातूनच बाहेर काढून त्या रूग्णाला वेळेव उपचारासाठी पोहचविण्यात यश मिळविले़ जर वेळेत ही रूग्णवाहिका रूग्णालयापर्यंत पोहचू शकली नसती तर एकाचा जीव जाण्याची वेळ आली असती हेही तितकेच खरे़़़ यावेळी मार्डी येथील मराठा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी याकामी मोठी मदत केली़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसhospitalहॉस्पिटल