शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

टोलमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांना मेसेज--येथे पाठवा एस.एम.एस.

By admin | Updated: November 26, 2014 00:23 IST

रविवार पेठेचा निर्धार : एक लाख एस.एम.एस.पाठविणार

कोल्हापूर : कोल्हापूरला टोलमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना एक लाख एस.एम.एस. पाठविण्याचा निर्धार आज, मंगळवारी संयुक्त रविवार पेठेच्यावतीने करण्यात आला. ‘आपला एक एस.एम.एस. कोल्हापूर टोलमुक्त करू शकतो’ या फलकाचे अनावरण बिंदू चौक येथे करून या मोहिमेला पेठेच्यावतीने प्रारंभ केला. कोल्हापूरला टोलमुक्त करण्यासाठी अनेक बैठका झाल्या, उपोषणे झाली, रास्ता रोको झाले. प्रसंगी टोलनाकेसुद्धा पेटविले गेले, तरीसुद्धा कोल्हापूरचा टोल सुरूच असल्याने त्याबाबतच्या जनभावना थेट नूतन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी रविवार पेठेच्यावतीने हा उपक्रम हाती घेतला आहे. ‘आपला एक एस.एम.एस. कोल्हापूर टोलमुक्त करू शकतो’ असे भावनिक अहवान करणारे फलक रविवार पेठेच्यावतीने आज बिंदू चौकात लावण्यात आले. या उपक्रमाबाबत बोलताना महेश ढवळे म्हणाले, कोल्हापूरचा टोल हटविल्याशिवाय कोल्हापूरची जनता शांत बसणार नाही. टोलविरोधी आंदोलनाचा हासुद्धा एक टप्पा असून, यासाठी आम्ही यावेळी सोशल मीडियाचा वापर करीत आहोत. शहरातील विविध व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही या उपक्रमाबाबत जनजागृती करणार आहोत. एक लाख एस.एम.एस. तरी आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहोत. याप्रसंगी विनायक चंदुगडे, आप्पा लाड, बाळासाहेब मुधोळकर, रवी पाटील, अशोक भोसले, उदय पाटील, संजय तोरस्कर, अमोल मोरे, गजानन तोडकर, आदी उपस्थित होते.येथे पाठवा एस.एम.एस. कोल्हापूरच्या टोलबाबत तुमच्या भावना ०९७३०४७५७१३ व ०९३७३१०७८८१ या मुख्यमंत्र्यांच्या मोबाईलवर एस. एम. एम. पाठवून कळवा, असे आवाहन संयुक्त रविवार पेठेच्यावतीने यावेळी करण्यात आले.