शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

पत्र्याचे शॉपिंग सेंटर उभारून शाळेचा रस्ता केला बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST

सोलापूर-मंगळवेढा रस्त्यालगत असलेल्या तिऱ्हे गावची जिल्हा परिषद शाळेच्या ५ खोल्या स्त्यात गेल्या आहेत. रस्त्याचे काम करताना गरजेनुसार काही खोल्यांचे ...

सोलापूर-मंगळवेढा रस्त्यालगत असलेल्या तिऱ्हे गावची जिल्हा परिषद शाळेच्या ५ खोल्या स्त्यात गेल्या आहेत. रस्त्याचे काम करताना गरजेनुसार काही खोल्यांचे पाडकाम केले आहे तर चार वर्गखोल्या आहेत. मात्र कोरोनामुळे शाळा बंद असताना काहींनी शाळेसमोरील

रस्त्यालगतच्या मोकळ्या जागेत पत्र्याचे शाॅपिंग उभारले आहे. आता शाळा सुरू झाल्यानंतर या शॉपिंगमुळे शाळेत जाण्याचा रस्ता बंद झाला आहे.

ही बाब लक्षात आल्याने मुख्याध्यापकांनी २५ नोव्हेंबर रोजी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. वर्गात जाता येत नाही व साहित्यही बाहेर काढता येत नाही, असे मुख्याध्यापकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते. मात्र त्याची दखल कोणीच घेतली नाही.

प्रत्यक्षात २७ जानेवारीपासून शाळा सुरू झाल्यानंतर नागरिकांना ही बाब लक्षात आली. विजय जाधव व इतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना अनधिकृत पत्रा शेड काढून शाळेचा रस्ता रिकामा करून देण्याबाबत पत्र दिले आहे.

-----

मुलांपेक्षा मुली अधिक

ग्रामस्थ व मुख्याध्यापकांचे पत्र मिळाले आहे. अतिक्रमण शेड काढण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी बापूसाहेब जमादार यांनी सांगितले.

- पर्याय म्हणून मंदिरात शाळा भरविण्यास सुरुवात केली; मात्र मुली आल्याच नाहीत.

- तिर्हे येथे पाचवी ते सातवी इयत्तेत ३४ मुली व ३१ मुले असे एकूण ६५ विद्यार्थी आहेत. पैकी ११ मुली शाळेत येत आहेत.