शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निवासी डॉक्टरांचे सामूहिक रजा आंदोलन

By admin | Updated: August 23, 2014 00:45 IST

डॉक्टरांची निदर्शने : जाधव कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी

सोलापूर : निवासी डॉक्टर किरण जाधव यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांस आर्थिक मदत मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांच्या मार्ड (महाराष्ट्र असोसिएशन आॅफ रेसिडेन्ट डॉक्टर्स) या संघटनेने शुक्रवारी पुकारलेल्या सामूहिक रजा आंदोलनात १३० निवासी डॉक्टर सहभागी झाले होते. दरम्यान, शासकीय रुग्णालयातील ‘बी’ ब्लॉकसमोर जोरदार निदर्शने करीत डॉक्टरांनी आपल्या व्यथा मांडल्या. ‘बी’ ब्लॉकमध्ये रुग्णसेवा बजावत असताना डॉ. किरण जाधव यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकारामुळे निवासी डॉक्टरांवरील मानसिक, शारीरिक तणाव व त्यातून निर्माण होणारे वैफल्य या गोष्टी समोर आल्या आहेत. वेळोवेळी मार्ड संघटनेने शासनाकडे पत्रव्यवहार करून मागण्या मांडल्या आहेत. त्याबाबत शासनाने आणि इथल्या प्रशासनाने कोणतेच पाऊल उचलले नाही. सरकारच्या उदासीनतेमुळे डॉ. किरण जाधव यांच्या रूपात तिसरा बळी गेला. मागण्यांचा पाठपुरावा करूनही शासनाने दखल घेतली नाही. समस्यांची पुन्हा जाणीव करून देण्यासाठी मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. राहुल राऊत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी १३० निवासी डॉक्टर सकाळी ८ पासून सामूहिक रजेवर गेले. त्यानंतर ‘बी’ ब्लॉकसमोर निदर्शने करून शासनाचा जेणेकरून स्थानिक प्रशासनाचा निषेध नोंदवला.-------------------------------------------या आहेत निवासी डॉक्टरांच्या मागण्याडॉ. किरण जाधव यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. त्यांच्या आत्महत्येस पूर्ण व्यवस्थाच जबाबदार असल्याने आज त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. यावर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने त्यांच्या घरातील एकास शासकीय सेवेत घेण्याची मागणी मार्डने केली आहे. बंधपत्रातील ५० लाख रुपयांची रक्कम त्यांच्या कुटुंबीयांस देण्यात यावी. विविध रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत. जेणेकरून निवासी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल.कामाचे तास निश्चित करण्यात यावेत. महाराष्ट्रातही सेंट्रल रेसिडेन्सी स्किम लागू करण्यात यावी. रुग्णसेवा विस्कळीतडॉ. किरण जाधव आत्महत्येप्रकरणी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने शुक्रवारी सामूहिक रजा आंदोलन करून ‘बी’ ब्लॉकसमोर निदर्शने केली. निवासी डॉक्टर सामूहिक रजेवर गेल्याने शुक्रवारी सकाळी शासकीय रुग्णालयाच्या सर्वच विभागांतील रुग्णसेवा विस्कळीत झाली. त्याचा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना फटका बसला. स्थानिक प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करून रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न केला.