शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राजलक्ष्मीच्या जाण्याने शाळाही हळहळली...!

By admin | Updated: July 21, 2014 01:13 IST

लिफ्टने घेतला बळी : शाश्वत अपार्टमेंटमधील प्रकार

सोलापूर : प्रत्येक वर्षी नंबर वन... हुशार, हरहुन्नरी... शिकवलेले अन् न शिकवलेले... वर्गातील, इतर वर्गांमधीलही मैत्रिणींची साथसंगत कायम ठेवणारी राजलक्ष्मी उर्फ अमिशाने रविवारी सकाळी जगाचा निरोप घेतला. तिच्या जाण्याने गणपती घाटानजीक असलेली सरस्वती विद्यामंदिर हळहळली. दत्त चौकातील शाश्वत मॅझिस्टिक या अपार्टमेंटमधील लिफ्टमध्ये अडकलेल्या राजलक्ष्मीला विजेच्या धक्क्याच्या रुपात आलेल्या काळाने झडप घातली. माजी नगरसेविका जयश्री शिंदे आणि सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यांची राजलक्ष्मी ही कन्या तर गामा पैलवान यांची नात. वर्षभरापूर्वी कुटुंबातील सर्वच सदस्य दत्त चौकातील शाश्वत अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर राहायला आले होते. घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सरस्वती विद्या मंदिरात सातवीत शिकत होती. टॅलेंट असलेल्या राजलक्ष्मीची स्मरणशक्तीही जोरदार होती. मॉनेटर म्हणून ती वर्गही हॅन्डल करीत होती. शनिवारी तिने वैभवी अंजीखाने, वैभवी आडम, वैष्णवी गोब्बूर, वैष्णवी क्षीरसागर आणि विनिता पुडूर या पाच सवंगड्यांना घरी भोजनाचे आमंत्रण दिले होते. मैत्रिणींच्या जेवणाची तयारी म्हणून आई जयश्री स्वयंपाकाच्या कामाला लागल्या होत्या. रविवारी सकाळी १० ची वेळ. राजलक्ष्मी ही आपली चुलत बहीण राजनंदिनीबरोबर लिफ्टमधून तळमजल्यावर आली. शाम्पू घेऊन लिफ्टमध्ये जात असतानाच अचानक दरवाजामध्ये ती अडकली गेली. त्यातच विजेचा धक्का बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. राजनंदिनी मात्र बाहेर असल्यामुळे ती बालंबाल बचावली. अखेर लिफ्ट तोडून तिला बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत तिचा जीव गेला होता. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. तिच्या अपघाती निधनाचे वृत्त वाऱ्यासारखे शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या, शिक्षक, शिक्षिकांच्या घरापर्यंत पसरले. ‘अशी मुलगी होणे नाही’, अशा भावना शाळेत तिला शिकवलेले, न शिकवलेले शिक्षक, शिक्षिकांनी व्यक्त केल्या. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ बलराज असा परिवार आहे. ----------------------------जेवण न देताच तू निघून गेलीस !शाळा सुरु झाल्यानंतर प्रत्येक रविवारी एकीच्या घरी जेवणाचे आमंत्रण, असा बेत ठरला होता. पहिलेच आमंत्रण राजलक्ष्मीने दिले. रविवारी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान तिच्या पाच मैत्रिणी येणार होत्या. त्याआधीच राजलक्ष्मीने जगाचा निरोप घेतला. जेव्हा ही बातमी कळली तेव्हा तिच्या पाचही मैत्रिणींच्या पायाखालची वाळू घसरली. वैभवी आडम, वैभवी अंजीखाने, वैष्णवी गोब्बूर, वैष्णवी क्षीरसागर आणि विनिता पुडूर यांनी हुंदके देत ‘जेवण न देताच तू निघून गेलीस...’ अशा भावना व्यक्त केल्या.-------------------------लिफ्टकडे दुर्लक्षशाश्वत अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर मनगोळी हॉस्पिटल आहे. ग्रामीण भागातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमुळे लिफ्टचा अधिक वापर होतो. वर्षभरापूर्वी लिफ्ट बंद पडली होती, याची आठवण करून देताना मराठा महासंघाचे दास शेळके यांनी राजलक्ष्मीच्या अपघाताचे कारण असुरक्षित लिफ्ट असल्याचे सांगितले.