शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-सोलापूर विमानसेवेसाठी तयारी

By admin | Updated: July 12, 2014 00:39 IST

सोलापुरात बैठक : विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पुढाकार

अकलूज : सोलापूर ते मुंबई विमानसेवा देण्यासाठी एक खासगी कंपनी तयार झाली असून, त्या संदर्भातील धोरण आखण्यासाठी उद्या सोलापूर येथे महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली. सुप्रीम एव्हिएशन इअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सोलापूर ते मुंबई अशी दैनंदिन विमानसेवा देण्यास राजी झाली आहे. या कंपनीचे अध्यक्ष अमित अग्रवाल यांच्याशी आपली प्राथमिक चर्चा आज झाली असल्याचे खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. या बैठकीत अमित अग्रवाल यांनी सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्यास आपण तयार आहोत, असे खा. मोहिते-पाटील यांना सांगितले. या विमानसेवेची पुढील ध्येयधोरणे ठरवण्यासंदर्भात उद्या दि. १२ रोजी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी २ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी सुप्रीम एव्हिएशन इअर इंडिया प्रा. लि. चे अध्यक्ष अमित अग्रवाल, सोलापूरमधील चेंबर आॅफ कॉमर्सचे पदाधिकारी, सदस्य, आमदार, सोलापूरच्या महापौर अलका राठोड आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कंपनीने विमानसेवा सुरू केल्यानंतर सोलापूरवरून विमानाची निघण्याची वेळ व मुंबईहून परत येण्याची वेळ या संदर्भातील सविस्तर चर्चा या बैठकीत होणार आहे. या बैठकीसाठी सोलापूरमधील संबंधित पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खा. मोहिते-पाटील यांनी केले आहे. ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर सोलापूरच्या विकासात आणखी भर पडणार आहे. त्याशिवाय जिल्ह्याच्या दृष्टीनेही ही विमानसेवा महत्त्वपूर्ण असल्याचे खा. मोहिते-पाटील यांनी सांगितले. सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी नित्य विमानसेवा असावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आली आहे. ही विमानसेवा सुरू झाल्यानंतर येथील दळणवळणाला गती प्राप्त होईल. त्यासाठी अशी विमानसेवा सुरू करण्यासाठी वारंवार प्रयत्न सुरू होते. अनेक खासगी विमान कंपन्यांशी या संबंधात चर्चा सुरू होती. त्यातून आता सुप्रीम एअर एव्हिएशन एअर इंडिया प्रा. लि. या कंपनीने ही सेवा देण्यास सहमती दाखविल्याने सोलापूरची नित्य विमानसेवा लवकर सुरू होणे अपेक्षित आहे, असे खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)