शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावे झाली सर्वसाधारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST

उत्तर सोलापूर तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी निश्चित करण्यात आले. तहसीलदार जयवंत पाटील, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे, ...

उत्तर सोलापूर तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण बुधवारी निश्चित करण्यात आले. तहसीलदार जयवंत पाटील, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे, नायब तहसीलदार जयंत जुगदार, सभापती रजनी भडकुंबे, बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, प्रकाश चोरेकर आदींसह तालुक्यातील विविध गावांतील लोकांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात आली. प्रथम अनुसूचित जमातीसाठी जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात एक गाव निश्चित करण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी सहा गावे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने निश्चित करण्यात आली.

इतर मागास (नामाप्र) साठी १९९५, २०२० व २००५ मध्ये एकवेळ आरक्षण झालेल्यांपैकी १० गावे निश्चित करण्यात आली.

----

- अनुसूचित जमाती- कारंबा

- अनुसूचित जाती- वांगी, शिवणी, खेड (महिला), पडसाळी, कवठे, रानमसले

- इतर मागास- हगलूर, नंदूर- समशापूर, साखरेवाडी, कोंडी, डोणगाव (महिला), पाकणी, गावडी दारफळ, तळेहिप्परगा, तेलगाव, भागाईवाडी

- सर्वसाधारण महिला- होनसळ, बेलाटी, भोगाव, सेवालालनगर, एकरुख-तरटगाव, मार्डी, अकोलेकाटी, नान्नज, कौठाळी व पाथरी,

- सर्वसाधारण- बीबी दारफळ, वडाळा, नरोटेवाडी, हिरज, तिर्हे, गुळवंची, बाणेगाव, राळेरास व कळमण.

---

वडाळ्यात ३१ वर्षांनंतर साठे...

वडाळ्यात १७ मे १९६५ रोजी बळीरामकाका साठे हे सरपंच झाले होते. काकांनी २४ वर्षे सहा महिने सरपंच म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर जिल्हा परिषदेत सक्रिय झाले. आता वडाळा सरपंचपदासाठी सर्वसाधारण झाल्याने काकांचे पुत्र जितेंद्र साठे सरपंच होण्याची शक्यता आहे.

- तळेहिप्परग्यात सरपंचपद आरक्षित झाल्याने पॅनलप्रमुख कुमार भिंगारे, तसेच बीबी दारफळमध्ये पॅनल प्रमुख हरल्याने सरपंचपद कार्यकर्त्यांना मिळणार आहे.

- खेड अनुसूचित जातीसाठी, तर वांगी अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाले आहे. मात्र, खेडमध्ये अनुसूचित जातीचा सदस्य, तर वांगीत अनुसूचित जातीची महिला नाही.

- नान्नज, अकोलेकाटी, कौठाळी सर्वसाधारण महिलेसाठी, तर हिरज, तिऱ्हे, कळमण, बाणेगाव ही गावे सर्वसाधारण झाली.

- पडसाळी अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने धर्मा रोकडे यांची निवड होणार आहे.

----