सोलापूर महानगरपालिकेचे पाण्यावरच तापणार राजकारणशंकर जाधव - सोलापूर आॅनलाईन लोकमतमहापालिकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यावर प्रत्येक पक्षाकडे इच्छुकांचा आकडा शंभरी पार करून चालला आहे. पण प्रत्यक्षात निवडून येणारे १०२ व स्वीकृत ५ सदस्यांमध्ये मूलभूत समस्यांवर बोलणारे किती जण असतील, हे न बोललेले बरे. गेली पाच वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्यांपैकी ५0 जणांनी सभागृहात कायम मौन बाळगले. अभ्यास करून समस्यांवर बोलणारे फक्त १७ जणच होते, तर ४0 जणांनी बोलण्याचा प्रयत्न केला. सन २०१२ च्या निवडणुकीत निवडून दिलेल्या सदस्यांची ही अवस्था आहे. निवडणूक लागली की आम्ही हे करू, ते करू बोलणारे प्रत्यक्ष निवडून आल्यावर महापालिकेच्या सभागृहात येताना किती तयारीने येतात, हे पाहून आश्चर्याचा धक्का बसेल. दरमहा महापालिकेची मासिक सर्वसाधारण सभा काढली जाते. बहुतांश सदस्य सभेची विषयपत्रिका न वाचताच सभागृहात येतात. आलेला प्रस्ताव काय असतो व चर्चा कशावर सुरू आहे, याचेही भान काही जणांना नसते. विषय एक सुरू असतो तर मत मांडण्यासाठी उठलेले भलतेच बोलत असताना महापौरांना त्यांना आवरावे लागते, अशा अनेक गमती-जमती सभागृहात पाहावयास मिळाल्या. १०२ निवडून आलेल्या सदस्यांपैकी फक्त १५ सदस्य कायम बोलत राहिले. त्यात अभ्यास करून विषयावर बोलणाऱ्यांची संख्या १० आहे. केवळ आपल्या प्रभागातील समस्या मांडायची म्हणून ४0 जणांनी मोडके-तोडके भाषण करण्याचा प्रयत्न केला. ५0 सदस्यांनी सभागृहात कायम मौन बाळगण्यात धन्यता मानली. फारतर एखाद्यावेळी निषेध, घोषणा देताना मागे जाण्यासाठी या सदस्यांचा उपयोग झाला. ५१ महिलांनी सभागृहात नेतृत्व केले. त्यात सभागृहात विषयाचा अभ्यास करून बोलणाऱ्या ५, प्रभागातील समस्या मांडणाऱ्या १८ सदस्य होत्या. इतर २८ महिला सदस्यांनी शांत राहणेच पसंत केले. -------------------यांनी केला विषयाचा अभ्याससभागृहात पक्षनेते संजय हेमगड्डी, विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, महेश कोठे, पांडुरंग दिड्डी, सुरेश पाटील, नागेश वल्याळ, आनंद चंदनशिवे, मनोहर सपाटे, जगदीश पाटील, चेतन नरोटे, दिलीप कोल्हे, अनिल पल्ली यांनी बऱ्याचवेळा अभ्यासपूर्ण भाष्य केले. त्याखालोखाल संजय कोळी, चंद्रकांत रमणशेट्टी, उदयशंकर चाकोते, राजकुमार हंचाटे, देवेंद्र भंडारे, बाबा मिस्त्री, भीमाशंकर म्हेत्रे, मधुकर आठवले यांनी समस्या स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. स्वीकृत पाच सदस्यांपैकी सत्ताधाऱ्यांतर्फे अॅड. यु. एन. बेरिया तर भाजपतर्फे अशोक निंबर्गी यांनी जोरदार खिंड लढविली. राष्ट्रवादीचे दीपक राजगे, सेनेचे शैलेंद्र आमणगी यांनीही प्रस्तावावर बोलण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे राजकुमार खराडे यांनी मात्र मौन राहणेच पसंत केले. -------------महिलांचा आवाज कमीचकाँग्रेसच्या अलका राठोड, सुशीला आबुटे यांना महापौर होण्याची संधी मिळाली. सत्ताधाऱ्यांमध्ये या दोघींव्यतिरिक्त इतरांनी विषयानुरूप भाष्य केले नाही. विरोधकांमध्ये रोहिणी तडवळकर, मोहिनी पतकी, इंदिरा कुडक्याल यांनी बऱ्याच वादग्रस्त प्रस्तावांना प्रखरपणे विरोध केला. त्यानंतर नरसूबाई गदवालकर, सुनीता कारंडे, कुमुद अंकाराम, संजीवनी कुलकर्णी, जगदेवी नवले, खैरुन्निसा शेख, श्रीदेवी फुलारे, सुनीता रोटे, अश्विनी जाधव, नीला खांडेकर, फिरदोस पटेल, अनिता म्हेत्रे, बिस्मिल्ला शिकलगार, विजया वड्डेपल्ली, शशिकला बत्तुल, परवीन इनामदार, शैलजा राठोड, सारिका सुरवसे यांनी प्रभागातील समस्या मांडण्याचा प्रयत्न केला.
सोलापूर महानगरपालिकेचे पाण्यावरच तापणार राजकारण
By admin | Updated: January 24, 2017 20:37 IST