शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पांडुरंगाची पालखी पंढरपूरकडे रवाना

By admin | Updated: July 29, 2014 01:17 IST

टाळ-मृदंगाचा गजर: सावता माळी पुण्यतिथी महोत्सवाची सांगता

अरण : संत शिरोमणी सावता माळी यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची सोमवारी सांगता झाली़ पांडुरंगाची पालखी भक्तिमय वातावरणात, टाळ-मृदंगाचा गजर आणि विठुनामाचा जयघोष करीत पंढरपूरकडे रवाना झाली़ सकाळपासून आकाशात ढग जमले होते, अधून-मधून श्रावणी सरी बरसत होत्या़ तेव्हा सकाळी ८ वाजता संत सावता माळी मंदिरापासून हजारो जनसमुदाय परतीच्या प्रवासाला निघाला़ दोन किलोमीटर अंतर भाविकांनी फुलून गेला होता़ टाळ-मृदंगाचा गजर, अभंग गात आणि विठुनामाचा जयघोष करीत मोठ्या उत्साहात अरण येथील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्यास निरोप दिला़ अरण येथील दत्तात्रय चौधरी, हरिभाऊ गोरे, हनुमंत जाधव, साधू गायकवाड, शिवदास वसेकर व टाळकरी मंडळींनी विसावा ठिकाणापर्यंत जयघोष करीत गेले होते़ पालखीच्या रथाला पंडित सुर्वे यांची बैलजोडी जुंपलेली होती़ यावेळी देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल गाजरे, अ‍ॅड़ विजय शिंदे, जि़ प़ सभापती शिवाजी कांबळे, भारत शिंदे, सावता रणदिवे, पुजारी रमेश वसेकर, अंकुश वसेकर, यात्रा कमिटीचे विलास वसेकर आदी उपस्थित होते़ ---------------------------रांगोळ्याच्या पायघड्या अरण येथील पाटील वस्तीवरील तरुणांनी दोन किलोमीटरपर्यंतच्या पालखी मार्गाची स्वच्छता करून रांगोळ्यांच्या आकर्षक पायघड्या साकारल्या होत्या़ यासाठी शिवाजी सावंत, शिवाजी पाटील, सुनील थोरात, प्रदीप पाटील, बाबू पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले़ पांडुरंगाची पालखी विसाव्याला थांबल्यानंतर भाविकांनी श्रद्धेने पेढे वाटून आनंद साजरा केला़ त्यानंतर नामदेव सावंत कुटुंबाच्या वतीने सर्व भाविकांसाठी भोजनाची सोय केली़ महामार्ग पोलीस व ग्रामीण पोलिसांनी पालखी मार्गावर बंदोबस्त ठेवला होता़