उत्तरच्या सभापतीपदी १० गावांनाच मिळाली संधीअरुण बारसकर - सोलापूरउत्तर तालुक्यातील ३६ पैकी अवघ्या १० गावांनाच सभापतीपदाची संधी मिळाली असून, २६ गावांना सभापतीपदाची संधी मिळाली नाही. पाच वर्षांचा कालावधी सोडला तर सतत सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसलाही विचार करावयास लावणारी बाब आहे.उत्तर सोलापूर तालुका पंचायत समिती अस्तित्वात आली ती १९६२ मध्ये. पंचायत समितीचे पहिले सभापती झाले होते बाणेगावचे बाबुराव भीमराव ढोणे. त्यानंतर सोलापूरचे पंढरी बनसोडे, कोंडीचे गणेश पाटील यांना उत्तरच्या सभापतीपदाची संधी मिळाली. पाटील यांच्यानंतर कुमठ्याच्या ब्रह्मदेव माने यांना संधी मिळाली. हद्दवाढीनंतर १९९२ मध्ये कुमठे गावाचा सोलापूर शहरात समावेश झाल्याने तालुक्यातून हे गाव कमी झाले. माने यांच्यानंतर मार्डीच्या किसनराव पाटील, अकोलेकाटीच्या शिवाजी क्षीरसागर, बेलाटीच्या जगन्नाथ पाटील, कौठाळीच्या हणमंतराव निचळ तिऱ्हेच्या हरिभाऊ जाधव यांना संधी मिळाली. अनेक वर्षे ब्रह्मदेव माने गटाचे वर्चस्व उत्तर सोलापूर तालुक्यावर होते. तालुक्यात असलेल्या ब्रह्मदेव माने व बाबुराव चाकोते यांच्या गटाच्या राजकीय लढाईत १९९२ मध्ये सत्तांतर झाले व चाकोते गटाची सत्ता पंचायत समितीवर आली. चाकोते गटाचे नेते बळीराम साठे यांनी नान्नजच्या नागनाथ विभुते यांना सभापतीपदाची संधी दिली. सलग पाच वर्षे सभापती म्हणून काम करताना विभुते यांनी कामाचा ठसा उमटविला होता.पाच वर्षांची चाकोते गटाची सत्ता उलथवून टाकण्यासाठी ब्रह्मदेव माने यांचे चिरंजीव दिलीप माने यांना यश मिळाले. माने हे डोणगाव पंचायत समिती मतदारसंघातून १९९७ मध्ये मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तेथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. माने यांच्यानंतर वडाळ्याच्या पांडुरंग पवार यांना सभापतीपद मिळाले. पवार यांनी वर्षभराचा कालावधी पूर्ण केल्यानंतर पुन्हा दिलीप माने सभापती झाले. त्यानंतर बेलाटीच्या विजया पाटील, अकोलेकाटीच्या रंजना धनंजय लामकाने, कवठ्याच्या रुक्मिणी केंगार व सध्या मार्डीच्या सुरेखा बाबासाहेब पाटील कार्यरत आहेत.
उत्तरच्या सभापतीपदी १० गावांनाच मिळाली संधी
By admin | Updated: January 24, 2017 19:57 IST