शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वृध्दांसाठी आता आधुनिक डोली...

By admin | Updated: November 23, 2014 23:43 IST

आनंद ओक : सुटसुटीत अन् कमी खर्चात रुग्णालयापर्यंत पोहोचा...

चिपळूण : येथील निवृत्त शिक्षक आनंद ओक यांनी आजारी किंंवा वयोवृद्ध व्यक्तिंच्या चलनवलनासाठी वेगळ्या पण सुटसुटीत पद्धतीची आधुनिक डोली तयार केली आहे. वयोवृद्ध लोकांसाठी ही आधुनिक डोली म्हणजे म्हतारपणाचा आधार आहे. पूर्वी श्रीमंत व्यक्ती किंवा राजघराण्यातील व्यक्तिंसाठी डोलीचा उपयोग केला जात असे. मात्र, हीच डोली सर्वसामान्य लोकांसाठी उपयोगात आणण्याची कल्पना ओक यांनी प्रत्यक्षात उतरविली आहे. ओक हे शहरातील तुळशी अपार्टमेंट येथे राहतात. तेथे त्यांनी आपल्या ८३ वर्षांच्या आई श्रीमती मंदाकिनी यांच्यासाठी प्रथम ही डोली तयार केली. आजारी किंवा वृद्ध व्यक्तिला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ती फायदेशीर आहे. आपल्या आईसाठी डोली तयार करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्या डोलीचा प्रचार करण्यासाठी ओक यांनी प्ुढाकार घेतला आहे. यापुढे ते आधुनिक डोली तयार करण्याबाबत लोकांना मोफत मार्गदर्शन करणार आहेत. दोन बांबूच्या काठ्या आणि एका खुर्चीने त्यानी ही आधुनिक डोली तयार केली आहे. या आधुनिक डोलीचे फायदे सांगताना ओक म्हणाले, आधुनिक खुर्ची अतिशय सुलभ आणि अखर्चिक आहे. दोन व्यक्ती या डोलीने आजारी किंवा वयोवृद्ध व्यक्तिला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज घेऊन जाऊ शकतात. वापरानंतर ती सोडून ठेवणे सहज शक्य आहे. कमी रुंदीच्या ठिकाणी प्रवास करतानाही या डोलीचा उपयोग होतो. ज्या व्यक्तिला बसवायचे आहे. त्याचे वजन बघूनच डोळी तयार करावी लागेल. समाजातील सर्व स्तरातील लोक या डोलीचा वापर करू शकतात. एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी ही आधुनिक डोली तातडीने तयार करून रुग्णांना मदत करता येईल. युनायटेड इंग्लिश स्कूलच्या शेजारी असलेल्या तुळसी अपार्टमेटमध्ये ते लोकांना आधुनिक डोली तयार करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. (प्रतिनिधी)