शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

अन् त्या स्मारकाचं नाव आहे ‘न झुकलेला माणूस’...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 15:12 IST

२०९ शहरांचा विध्वंस करण्यात आला आणि तब्बल ९२०० खेड्यांची स्मशाने झाली !

युजिफ कामीनेस्की एक सामान्य लोहार होता. तो काही शूरवीर योद्धा नव्हता, ज्याला विविध शस्त्रे चालवता येत होती. तो एक सामान्य माणूस होता, तरीही त्यानं एक असामान्य कर्तृत्व करून दाखवलं म्हणून बेलारूसमध्ये आजही त्याच्या पुतळ्यापुढे लोक नतमस्तक होतात. विशेष म्हणजे या स्मारकाचं नाव आहे ‘न झुकलेला माणूस! ’

२२ मार्च १९४३ रोजी बेलारूसमधील लोगॉईस प्रांतातील मिन्स्क भागातल्या खतीन नामक खेड्यातील सर्व नागरिकांचे नाझी सैन्याकडून शिरकाण करण्यात आले होते. दुसºया महायुद्धात बेलारूसमध्ये हत्याकांड ही सामान्य बाब झाली होती, इतक्या मोठ्या प्रमाणावर माणसं मारली गेली. अधिकृत आकडेवारीनुसार बेलारूसमध्ये ५२९५ वस्त्या / गावं बेचिराख केली गेली. एकट्या विटबॅक्स भागात २४३ गावं अशी होती की ती दोनदा जाळण्यात आली, तर ८३ गावं अशी होती की ती तीनदा जाळण्यात आली. तर २२ गावं अशी होती की तीन वेळा जाळून देखील ती पुन्हा उभी राहिली आणि नाझी सैन्याने ती चवथ्यांदा जाळली. २०९ शहरांचा विध्वंस करण्यात आला आणि तब्बल ९२०० खेड्यांची स्मशाने झाली!

नाझी आक्रमकांचा कब्जा असलेल्या तीन वर्षात बेलारूसमधली बावीस लाख तीस हजार माणसं मारली गेली. हा आकडा तिथल्या तत्कालीन लोकसंख्येच्या एक चतुर्थांश होता. युद्धे संपली. युद्धांच्या जखमा सोसलेली ती पिढीही काळाच्या पडद्याआड गेली. रशियाचं विघटन झालं आणि बाजूच्या अनेक राष्ट्रांनी आणखी मोकळा श्वास घेतला. बेलारूसमध्ये काही दशकांनी समृद्धी आली आणि युद्धाच्या झळा अनुभवलेल्या या देशाने शांती आणि संयमाचा पाठपुरावा केला. बेलारूसमधील सर्व हत्याकांडात खतीनचं बेचिराख होणं एक वेगळा संदेश घेऊन आलं. कारण त्या गावातली एकही प्रौढ व्यक्ती यात जीवित राहिली नव्हती, केवळ एक अपवाद होता तो म्हणजे युजिफ कामीनेस्की! नाझी सैन्याने हल्ला चढवला. बायका-पोरींना नासवलं. घरं जाळून टाकली. माणसंही जिवंत जाळली. अनेकांना तोफेने उडवलं. बंदुकांमधून जणू अग्निवर्षाव झाला. पाच किशोरवयीन मुलं आणि युजिफ कामीनेस्की जिवंत राहिले. रात्र उलटून गेल्यावर बेलारूशियन सैन्य गावात आलं तेव्हा त्यांनी जे दृश्य पाहिलं ते काळजावर ओरखडे आणणारं होतं.

बावन्न वर्षांचा कामीनेस्की निश्चल उभा होता आणि त्याच्या हातात त्याचा कोवळा मुलगा होता, ज्याचा देह छिन्नविच्छिन्न झाला होता. आपल्या कोवळ्या, निरागस, निष्पाप मुलाचं कलेवर हाती घेऊन ताठ मानेने उभा असलेला कामीनेस्की नीडरपणाचं प्रतीक मानला गेला. खतीन गाव पुन्हा वसवलं गेलं नाही कारण गावातलं कुणी उरलंच नव्हतं. १९६९ मध्ये इथे एक स्मारक उभं करण्यात आलं. जिथे कामीनेस्कीचा पुतळा उभारण्यात आला. या स्मारकात १८५ थडगी आहेत ज्यावर १८५ गावांची नावे लिहिली आहेत, जी पुरती नामशेष झाली, ज्यांनी अनन्वित अत्याचार झेलले. इथे कायम स्मशानशांतता असते मात्र दर तीस सेकंदाला इथे बारीक घंटानाद होतो. बेलारूसमधले जितके लोक मारले गेले त्यांच्या संख्येच्या प्रमाणात या घंटानादाचे सूत्र आहे. 

बेलारूसच्या जनतेनेही तेव्हा आपल्यावरील अत्याचारास सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. दोन्हीकडून बंदुका चालल्या मात्र कामीनेस्कीच्या मुलाचा दोष काय होता, हे आजवर कुणीच सांगू शकलं नाही. किंबहुना भविष्यात देखील याचं नेमकं आणि खरं उत्तर कुणी देणार नाही. खास करून अशी माणसं तर कधीच याचं उत्तर देऊ शकणार नाहीत ज्यांच्या अंगात युद्धाची खुमखुमी असते. हाणा, मारा, कापा, खलास करा, संपवून टाका असं म्हणणं कधीही सोपं असतं मात्र निर्माण करा किंवा निर्मिती करू या, असं म्हणणं कायम कठीणच असतं. रिकामटेकडी जनता, निष्क्रिय बेरोजगार तरुण आणि धगधगत्या सीमा हे राजकीय नेतृत्वाचे भांडवल असतं. ही पेटंट गिºहाईकं असतात, यामुळे नेहमी शासकांची गादी बळकट होते आणि जनता भुकेकंगाल होते. मात्र एका पिढीचा सर्वनाश झाल्यावरच जनतेला हे सत्य उमगते. कारण युद्धज्वराने त्या जनतेला पुरते ग्रासलेले असते! आपल्या डोक्यावर आपण कुणाला स्वार होऊ द्यायचे हे आपल्या हातात असते. मात्र त्यासाठी आपला विवेक जागा असायला हवा, नाहीतर आपण स्वत: युजिफ कामीनेस्कीचं जिगर राखलं पाहिजे ! - समीर गायकवाड (लेखक परिवर्तनवादी चळवळीचे समर्थक आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर