शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
4
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
5
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
6
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
7
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
8
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
9
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
10
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
13
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
14
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
15
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
16
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
18
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
19
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
20
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या

चंद्रदर्शन झाले; आज ईद

By admin | Updated: July 29, 2014 01:22 IST

पाच ठिकाणी नमाज : वाहतूक मार्गात बदल ; एसआरपीची तुकडी तैनात

सोलापूर : सर्वांची उत्सुकता लागून राहिलेल्या चंद्राचे दर्शन सोमवारी रात्री ८ नंतर झाले आणि सर्वांनी ईद साजरी करावी, असे जाहीर आवाहन रुयते हिलाल कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड़ मुफ्ती सय्यद अमजदअली काझी(शहर काझी) यांनी केले़ शहरातील पाचही ठिकाणी दोन दिवसांपासून सार्वजनिक नमाज पठणापूर्वची तयारी झाली़ प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शहर काझी आणि मौलवी यांनी रात्री चंद्रदर्शन होते की नाही? याचा अंदाज बांधत राहिले़ अखेर सोमवारी रात्री ८ नंतर अवकाशात चंद्रदर्शन झाले़ त्यानंतर ‘रुयते हिलाल कमिटी’चे अध्यक्ष अ‍ॅड़ काझी यांनी जामा मस्जिदमध्ये सर्व मस्जिदप्रमुखांची बैठक बोलावली़ या बैठकीत चंद्रदर्शन झाल्याचे जाहीर करुन मंगळवारी (२९ जुलै) ईद साजरी करण्याबाबत आवाहन केले़ तसेच शहरातील पाचही ठिकाणच्या सार्वजनिक नमाज पठणाच्या वेळा जाहीर केल्या गेल्या़ दरम्यान रमजान ईदनिमित्त शहर आणि परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला असून, पाच ठिकाणचे नमाज पठण शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची वेगळी आखणी केल्याचे विशेष शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अनिल पाटील यांनी सांगितले.होटगी रोडवरील ईदगाह, रंगभवन चौक, पानगल प्रशाला, किल्ला बागेजवळील आसार मैदान आणि जुनी मिल कंपौंड परिसरात नमाज पठाण होणार आहे. नमाज पठण आणि इतर भागांचा विचार करता शहरात पोलीस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, पी. आर. पाटील आणि अश्विनी सानप हे तिघे बंदोबस्तावर लक्ष ठेवून राहणार आहेत. बंदोबस्तासाठी २५ पोलीस निरीक्षक, ६७ सहायक पोलीस निरीक्षक, फौजदार, ८०० पोलीस कर्मचारी, ४२ महिला पोलीस कर्मचारी, २०० महिला आणि पुरुष होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपी) एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. होटगी रोडवरील नमाज पठणचा बंदोबस्त पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली २ सहायक पोलीस आयुक्त, ३ पोलीस निरीक्षक, ५ पीएसआय/एपीआय, ९० कर्मचारी, ४० होमगार्ड आणि १० वाहतूक शाखेचे पोलीस पार पाडणार आहेत.----------------------------इतर पथकेही सज्जरमजान ईद शांततेत पार पाडण्याबरोबर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी इतर पथकांवरही मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. संवेदन आणि अतिसंवेदनशील असणाऱ्या २५ ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. घातपातविरोधी पथकही सज्ज ठेवण्यात आले आहेत. साध्या वेशातील पोलीस संशयितांवर करडी नजर ठेवणार आहेत.