वाकाव (ता. माढा) येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव या विषयावर त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. पुढे बोलताना भुसारे म्हणाले प्रा. पी.ए. मिलार्डेट यांनी १९८२ मध्ये प्रथम मोरचूद आणि चुना यांच्या मिश्रणाचा फ्रान्समध्ये द्राक्षांवरील केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी वापर केला. तेव्हापासून सर्वत्र अनेक पिकांवर विशेषतः भाजीपाला आणि फळबागांवर पडलेल्या बुरशीजन्य रोगांवर एक प्रभावी उपाय म्हणून बोर्डो मिश्रणाचा उपयोग केला जात आहे.
यासाठी प्राचार्य डॉ. मिलिंद अहिरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. सी.एस. चौधरी, डॉ. अशोक वाळुंज, डॉ. शेळके डॉ. अनारसे, डॉ. सचिन सदाफळ यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.
---
ही खबरदारी घ्या
बोर्डो मिश्रण तयार करताना कळीचा चुना दगडविरहित असावा, मिश्रण करताना धातूच्या भांड्याचा वापर करू नये, फवारणी होईपर्यंत प्लॅस्टिक ड्रममध्ये मिश्रण साठवावे, दोन अलग केलेली द्रावणे एकमेकांत मिसळताना थंड असावीत, फवारणीसाठी मिश्रण वस्त्रगाळ करून वापरावे, पावसाळ्यात मिश्रण वापरताना चिकट द्रव (स्टिकर) सोबत वापरावे, क्षारयुक्त पाणी वापरू नये, खराब चुना किंवा भुकटी वापरू नये, मिश्रण ढवळताना लाकडी किंवा प्लॅस्टिक काठीचाच वापर करावा, असे भुसारे यांनी सांगितले.
फोटो ओळी-
वाकाव (ता. माढा) येथे शेतकऱ्यांना बोर्डो मिश्रणचे प्रात्यक्षिक करून दाखवताना महेश भुसारे व इतर.