शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मार्डी, कारंबा, नान्नजपैकी एक गाव अनु. जमातीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST

उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या असल्या तरी तालुक्यातील सर्वच ३६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची सोडत बुधवारी काढण्यात ...

उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या असल्या तरी तालुक्यातील सर्वच ३६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे. प्रथम अनुसूचित जमाती संवर्गासाठी एक गाव आरक्षित केले जाणार आहे. अनु. जमातीची सर्वाधिक लोकसंख्या तळेहिप्परगा येथे असून, २०१० मध्ये हे गाव अनु. जमातीसाठी आरक्षित झाले होते. त्यानंतर मार्डीत २९६, कारंबा १६३, नान्नज १५३ व गावडीदारफळ याप्रमाणे जमातीची लोकसंख्या आहे. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी सहा गावे आरक्षित करावयाची आहेत.

१९९५ पासून आतापर्यंत पडसाळी, वांगी, शिवणी, कवठे, खेड, रानमसले व भागाईवाडी ही गावे जातीसाठी आरक्षित झाली नाहीत. यामधून अनुसूचित जातीची लोकसंख्या सर्वाधिक असलेली सहा गावे अनुसूचित जातीसाठी आरक्षित होतील. त्यातील महिलांसाठी चिठ्ठीद्वारे तीन गावे निश्चित केली जाणार आहेत. भागाईवाडीत अनुसूचित जातीची संख्या सर्वांत कमी १० इतकी असल्याने या गावात जातीचे आरक्षण निघण्याची शक्यता कमीच आहे.

उर्वरित २९ गावांपैकी नऊ गावे इतर मागास (ओबीसी, नामाप्र), तर १० गावे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. ओबीसीचे आरक्षण ठरविताना २०१५ मध्ये आरक्षित असलेली बीबीदारफळ, तिर्हे, मार्डी, वडाळा, शिवणी, नरोटेवाडी, बेलाटी, गुळवंची, होनसळ व एकरुख- तरटगाव ही गावे वगळली जातील, असे सांगण्यात आले.

-----ठळक दृष्टिक्षेप...

-उत्तर तालुक्यातील १८ गावे महिला, तर १८ गावे सर्वसाधारण असतील.

- बुधवारी सकाळी ११ वाजता मतमोजणी झालेल्या नूतन मराठी प्रशालेत सोडत काढण्यात येईल, असे तहसीलदार जयवंत पाटील यांनी सांगितले.

- जमातीसाठी आरक्षण काढताना आतापर्यंतची आरक्षित गावे वगळून सर्वाधिक जमातीची लोकसंख्या असलेल्या गावामधून गावच्या एकूण लोकसंख्येत अधिक टक्के असलेले गाव आरक्षित करावयाचे आहे.

- भागाईवाडीत अनुसूचित जातीचा सदस्य नसला तरी इतर जागेवर निवडून आलेलाही जातीचा व्यक्ती सरपंच होऊ शकतो, त्यामुळे भागाईवाडीचेही आरक्षण अनुसूचित जातीसाठी निघू शकते, असे सांगण्यात आले.