शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

काँग्रेसची यादी जाहीर; ‘उत्तरे’तून सत्यजित कदमच

By admin | Updated: September 25, 2014 01:36 IST

सा. रे. पाटील पुन्हा रिंग्ांणात : सतेज पाटील, पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे यांच्यासह ११८ जणांचा समावेश

मुंबई : राष्ट्रवादीशी आघाडीचे अद्याप निश्चित नसतानाच काँग्रेसने आज, बुधवारी रात्री उशिरा आपल्या ११८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ‘कोल्हापूर उत्तर’मधून सत्यजित शिवाजीराव कदम यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. याशिवाय शिरोळमधून आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील पुन्हा रिंग्ांणात उतरत आहेत. ‘कोल्हापूर दक्षिण’मधून गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ‘करवीर’मधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, ‘हातकणंगले’मधून जयवंतराव आवळे आणि इचलकरंजीतून प्रकाश आवाडे यांचाही पहिल्या यादीत समावेश आहे.अमल महाडिक भाजपमध्ये प्रवेश करून ‘दक्षिण’मधून उमेदवारी घेणार असल्याने सत्यजित कदम यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार की नाही याबाबत उत्सुकता होती. मात्र, काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीतच त्यांचे नाव कोल्हापूर उत्तरमधून जाहीर केले आहे. शिरोळमधून सा. रे. पाटील यावेळी रिंग्ांणातून बाहेर राहतील, अशी चर्चा होती; मात्र विधानसभेतील सर्वांत वयोवृद्ध असलेल्या सा. रे. पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सांगलीतून माजी मंत्री मदन पाटील, पलूस-कडेगावमधून पतंगराव कदम, खानापूर-आटपाडी मतदारसंघातून सदाशिवराव पाटील यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.नवापूर, मालेगाव अशा मतदारसंघांमध्ये स्थानिक आमदारांना आपल्याकडे आणून आघाडीत उमेदवारी देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता; पण या दोन्ही ठिकाणी उमेदवार जाहीर करून काँग्रेसने राष्ट्रवादीचा दबाव झुगारला आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातील ११४ जागांपैकी मात्र कुठेही काँग्रेसने उमेदवाराची घोषणा केली नाही. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना आधीचा पूर्व नागपूर मतदारसंघ बदलून दक्षिण नागपुरात रिंगणात उतरविले आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांचे जवळचे मुख्यमंत्री चव्हाण, राणे, कदम, पाटील, दर्डा, आदींचा समावेशकाँग्रेसने आज जाहीर केलेल्या उमेदवार यादीनुसार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ‘दक्षिण कऱ्हाड’मधून निवडणूक लढणार आहेत. उद्योगमंत्री नारायण राणे, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, रोहयो मंत्री नितीन राऊत, परिवहनमंत्री मधुकरराव चव्हाण, वस्त्रोद्योगमंत्री नसीम खान, वर्षा गायकवाड, क्रीडामंत्री पद्माकर वळवी, पशुसंवर्धन मंत्री अब्दुल सत्तार, राज्यमंत्री सतेज पाटील, राजेंद्र गावित, डी. पी. सावंत, रणजित कांबळे, अमित देशमुख, आदी विद्यमान मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. -राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना अखेर संधी मिळाली नाही. नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांना पश्चिम नागपुरात संधी देण्यात आली आहे. माजी मंत्री अनिस अहमद यांना पश्चिम नागपूर हा मतदारसंघ बदलून त्यांच्या जुन्या मध्य नागपुरात पाठविण्यात आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध नगरसेवक प्रफुल्ल गुडधे ‘दक्षिण-पश्चिम’ नागपुरात लढतील.माजी राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांना चिमूरऐवजी ब्रह्मपुरीतून उमेदवारी दिली आहे. चिमूरमध्ये माजी आमदार अविनाश वारजूरकर हे उमेदवार असतील. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा यांना दक्षिण मुंबईतील मलबार हिल मतदारसंघात संधी मिळाली. त्या माजी मंत्री बी. ए. देसाई यांच्या कन्या आहेत. (प्रतिनिधी)उमेदवारांची नावे अशीअक्कलकुवा - अ‍ॅड.के.सी.पाडवी, शहादा - पद्माकर वळवी, नवापूर - सुरुपसिंग नाईक, साक्री - धनाजी अहिरे, सिंदखेड - श्यामकांत सनेर, शिरपूर - काशिराम पावरा, रावेर - शिरीश चौधरी, जामनेर - ज्योत्स्रा विसपुते, बुलडाणा - हर्षवर्धन सपकाळ, चिखली - राहुल बोंद्रे, खामगाव - दिलीप सानंदा, अकोट - महेश सुधाकर गणगणे, बाळापूर - सय्यद नतिकोद्दिन खतिब, रिसोड - अमित झनक, धामणगाव रेल्वे - वीरेंद्र जगताप, तिवसा - अ‍ॅड.यशोमती ठाकूर, मेळघाट - केवलराम काळे, अचलपूर - अनिरुद्ध देशमुख, आर्वी - अमर काळे, देवळी - रणजित कांबळे, सावनेर - सुनील केदार, नागपूर दक्षिण-पश्चिम - प्रफुल्ल गुडधे, नागपूर पश्चिम - विकास ठाकरे, नागपूर दक्षिण - सतीश चतुर्वेदी, नागपूर पूर्व - अभिजित वंजारी, नागपूर मध्य - अनिस अहमद, नागपूर उत्तर - नितीन राऊत, रामटेक - सुबोध मोहिते, तुमसर - प्रमोद तितरमारे, साकोली - सेवक वाघाये, गोंदिया - गोपालदास अग्रवाल, आमगाव - रामरतनबापू राऊत, आरमोरी - आनंदराव गेडाम, गडचिरोली - सगुणा पेंटाराम तलांडी, राजुरा - सुभाष धोटे, ब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवार, चिमूर - अविनाश वारजूरकर, वणी - वामनराव कासावार, राळेगाव - वसंत पुरके, उमरखेड - विजय खडसे, हदगाव - माधवराव पवार, नांदेड उत्तर - डी. पी. सावंत, नांदेड दक्षिण - ओमप्रकाश पोकर्णा, देगलूर - रावसाहेब अंतापूरकर, मुखेड - हनुमंतराव पाटील, कळमुनरी- संतोष तराफे, हिंगोली - भाऊराव पाटील, जिंतूर - रामप्रसाद बोर्डीकर, जालना - कैलाश गोरंट्याल, सिल्लोड - अब्दुल सत्तार, फुलंब्री - कल्याणराव काळे, औरंगाबाद पश्चिम - जितेंद्र देहाडे, औरंगाबाद पूर्व - राजेंद्र दर्डा, वैजापूर - डॉ. दिनेश परदेशी, मालेगाव मध्य - शेख रशीद, नाशिक मध्य - शाहू खैरे, इगतपुरी - निर्मला गावित, पालघर - राजेंद्र गावित, वसई - मायकेल फर्ताडो, भिवंडी पश्चिम - शोएब गुड्डू खान, ओवळा माजीवाडा - प्रभात प्रकाश पाटील, ठाणे - नारायण शंकर पवार, दहिसर - शीतल म्हात्रे, मुलुंड - चरणजितसिंग सप्रा, जोगेश्वरी पूर्व - राजेश शर्मा, दिंडोशी - राजहंस सिंह, चारकोप - भारत पारेख, मालाड पश्चिम - अस्लम शेख, वर्सोवा - बलदेव खोसा, अंधेरी पश्चिम - अशोक जाधव, अंधेरी पश्चिम - सुरेश शेट्टी, विलेपार्ले - कृष्णा हेगडे, चांदीवली - नसीम खान, घाटकोपर पश्चिम - प्रवीण छेडा, चेंबूर - चंद्रकांत हांडोरे, कलिना - कृपाशंकरसिंह, वांद्रे पश्चिम - बाबा सिद्दीकी, धारावी - वर्षा गायकवाड, सायन कोळीवाडा - जगन्नाथ शेट्टी, वडाळा - कालिदास कोळंबकर, भायखळा - मधु चव्हाण, मलबार हिल - अ‍ॅड. सुशीबेन शहा, मुंबादेवी - अमिन पटेल, कुलाबा - अ‍ॅनी शेखर, उरण - महेंद्र घरत, पेण - रवींद्र पाटील, अलिबाग - मधुकर ठाकूर, इंदापूर - हर्षवर्धन पाटील, भोर - संग्राम थोपटे, शिवाजी नगर; पुणे - विनायक निम्हण, पुणे कॅन्टोंमेंट - रमेश बागवे, कसबा पेठ - रोहित टिळक, संगमनेर - बाळासाहेब थोरात, शिर्डी - राधाकृष्ण विखे-पाटील, श्रीरामपूर - भाऊसाहेब कांबळे, अहमदनगर शहर - सत्यजित तांबे, लातूर ग्रामीण - त्र्यंबक भिसे, लातूर शहर - अमित देशमुख, औसा - बसवराज पाटील, उमरगा - किसन कांबळे, तुळजापूर - मधुकरराव चव्हाण, सोलापूर उत्तर - विश्वनाथ चाकोते, सोलापूर मध्य - प्रणिती शिंदे, अक्कलकोट - सिद्धराम मेहेत्रे, सोलापूर दक्षिण - दिलीप माने, कऱ्हाड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण, राजापूर - राजेंद्र देसाई, कुडाळ - नारायण राणे, कोल्हापूर दक्षिण - सतेज पाटील, करवीर - पी. एन. पाटील, कोल्हापूर उत्तर - सत्यजित कदम, हातकणंगले - जयवंत आवळे, इचलकरंजी - प्रकाश आवाडे, शिरोळ - सा. रे. पाटील, सांगली - मदन पाटील, पलूस कडेगाव - डॉ. पतंगराव कदम, खानापूर - सदाशिवराव पाटील.