शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

महसूलमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही भूमी अभिलेखचे कर्मचारी संपावर ठाम

By राकेश कदम | Updated: May 30, 2025 19:54 IST

आंदाेलन कायदेशीर असल्याचा दावा : पुणे विभागीय संघटनेचे निवेदन

साेलापूर  - राज्यातील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदाेलन बेकायदेशीर आहे. त्यांनी त्वरीत कामावर हजर व्हावे अन्यथा कारवाई करू असा इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी साेलापुरात दिला हाेता. मात्र आमचे आंदाेलन आणि कामबंद आंदाेलन कायदेशीर आहे. त्यामुळे आंदाेलन कायम राहिल, असे भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

पुणे विभागातील भूमी अभिलेख संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, कार्याध्यक्ष संताेष जावळकाेटी, उपाध्यक्ष संताेष जाधव, सचिव विलास लिंगराज यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी एक निवेदन जारी केले. पवार म्हणाले, राज्यातील भूमी अभिलेख कर्मचारी १५ मे पासून संपावर आहेत. आमच्या मागण्यांसाठी आम्ही सर्वप्रथम २०१५ मध्ये २४ दिवसांचा संप केला हाेता. शासनाने आश्वासन दिल्यामुळे संप स्थगित केला. त्यानंतर विविध मागण्यांसाठी आमचा लढा सुरू आहे. सुधारीत वेतनश्रेणीसाठी फेब्रुवारीमध्ये आंदाेलन सुरू केले. २७ फेब्रुवारी राेजी विभागीय उपसंचालकांकडे बैठक झाली हाेती. मार्च महिन्यात दाेनवेळा काम बंद आंदाेलन केले. सरकारच्या आश्वासनामुळे आम्ही थांबलाे. आता सरकार लक्ष द्यायला तयार नाही म्हटल्यावर आम्ही २६ एप्रिल राेजी संप पुकारणार असल्याचा इशारा दिला हाेता. त्यानुसार आम्ही १५ मे पासून संपावर आहाेत. आमच्या आंदाेलनाला राजपत्रित अधिकारी संघटनेने पाठिंबा दिला आहे.संपाच्या काळातच चर्चा कराकर्मचारी कामावर आले तरच चर्चा करू असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले हाेते. मात्र सरकारने आमच्यासाेबत संपाच्या काळातच चर्चा करावी. राज्यातील १८ लाख सरकारी कर्मचारी आमच्या बाजूने आहेत. त्यामुळे आंदाेलन कायम राहिल, असा इशारा ज्ञानेश्वर पवार, संताेष जाधव यांनी दिला.शहर, ग्रामीणचे काम ठप्पभूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहर आणि ग्रामीण भागाती शेतजमीन, शहरातील प्लाॅटिंगची माेजणी यासह अनेक कामे ठप्प झाली आहेत. हा संप कधी मिटणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.