शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

खाकी वर्दीची ऐशीतैशी !

By admin | Updated: July 16, 2014 00:45 IST

मनोरुग्णाचा प्रकार : काही काळ वाहतुकीचे केले नियोजन!

 सोलापूर: पोलीस खात्यात खाकी वर्दीला मान-सन्मान आहे. खात्यातील अधिकारी, कर्मचारीच खाकी वर्दी परिधान करू शकतात. इतर कोणी खाकी पोशाख परिधान करू शकत नाही. मंगळवारी सकाळी सात रस्ता चौकातील शासकीय विश्रामगृहासमोरील एका ट्रॅफिक बूथमध्ये चक्क एका मनोरुग्णाने खाकी वर्दी घालून काही काळ वाहतुकीचे नियोजनही केले. शासकीय विश्रामगृहासमोरील एका कंपनीने विशिष्ट आणि लहानशा आकारातील ट्रॅफिक बूथ दिले आहे. वास्तविक या बूथचा वापर होत नाही. याच बूथच्या कट्ट्यावर खाकी वर्दी परिधान केलेला वेडसर इसम येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांचे कधी निरीक्षण करायचा, तर मधूनच तो बूथमध्ये थांबून वाहतूक पोलिसांप्रमाणे हातवारे करायचा. मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना याचे नवलही वाटत होते अन् आश्चर्यही. त्यातच एका अधिकाऱ्याची पोलीस गाडीही तेथून पास झाली. त्यांच्याही लक्षात हा प्रकार आला नाही, हे विशेष म्हणावे लागेल. त्याला बोलते केले असता तो मूळचा अहमदाबादचा असल्याचे समजले. ५० टक्के वेडसर असलेला हा अर्जुन सोलापुरातील भावाकडे आला आहे. पोलीस पोशाख कुठून मिळविलास, यावर त्याने सांगणे नाकारले. रस्त्यावर हातवारे करीत असताना त्याचे अनेक पोज छायाचित्रकाराने टिपले. पोज देताना मात्र तो पोशाखावरील महाराष्ट्र पोलीस आणि खात्याचे बोधचिन्ह न घेण्याचा सल्लाही दिला.---------------------दुरुपयोग नको !आजपर्यंतचे अनेक गुन्हे पाहता पोलिसांचा पोशाख, रेनकोट, मोटरसायकली (ज्यावर पोलीस असा उल्लेख आहे) आदींचा वापर करीत चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. पोलिसांचा एखादा पोशाख खराब झाला तर त्यावरील बोधचिन्ह न काढता ते तसेच टाकून दिले तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. याविषयी खात्याची निश्चित नियमावली असू शकते. ------------------अधिकारी, कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कुणीही खाकी वर्दी घातली तर तो गुन्हा होऊ शकतो. वर्दी खराब झाली तर ती कोणालाही देण्यापूर्वी अथवा निकालात काढण्यापूर्वी त्यावरील पोलीस खात्याचा बॅच काढून घेणे बंधनकारक आहे. त्याचा अवमान होता कामा नये. - खुशालचंद बाहेतीसहायक पोलीस आयुक्त