शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

मुलाखत; शरीरातील तापमानाचा समतोल बिघडल्यानेच साथीचे आजार वाढले : शार्दुल कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 12:45 IST

दोन ऋतूंचा संगम : दिवसा ऊन, रात्री थंडीच्या वातावरणात शरीराची घ्या काळजी

ठळक मुद्देदोन ऋतूंच्या या विचित्र संगमामुळे साथीचे आजार मोठ्या प्रमाणात वाढलेनोव्हेंबरचा अर्धा महिना सरला तरी आॅक्टोबर हीट कमी झालीहिवाळ्यामुळे रात्री थंडी पडत आहे. पहाटेचे तापमान १४ अंशांपर्यंत आले

महेश कुलकर्णी सोलापूर : नोव्हेंबरचा अर्धा महिना सरला तरी आॅक्टोबर हीट कमी झाली नाही. दुसरीकडे हिवाळ्यामुळे रात्री थंडी पडत आहे. पहाटेचे तापमान १४ अंशांपर्यंत आले आहे. दोन ऋतूंच्या या विचित्र संगमामुळे साथीचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वेगवेगळ्या ऋतूंच्या संगमामुळे शरीरातील थर्मल बॅलन्स (शरीराच्या तापमानाचा समतोल) बिघडल्याने आजार वाढत असल्याची माहिती सोलापुरातील प्रसिध्द जनरल फिजिशियन डॉ. शार्दुल कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधताना दिली.

गुलाबी थंडी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. मात्र थंडीत होणारे आजार कोणालाच नको असतात. जसजशी थंडीची चाहूल लागते तसतसे वातावरणातील बदलही जाणवू लागतो. वातावरणातील बदलामुळे सर्दी, पडसे, खोकला, घसादुखी तसेच उष्णतेमुळे ताप, डिहायड्रेशन, डोकेदुखी हे आजाराचे प्रमाण वाढत असल्याचेही डॉ़ कुलकर्णी यांनी सांगितले.

साथीच्या आजारात काही घरगुती उपाय...

  • निलगिरी तेलाच्या वासाने सर्दी कमी होते

- हिवाळ्यात जसजसे तापमान घटत जाते तसतसे सर्दी आणि नाकातून पाणी येण्यास सुरुवात होते. यासाठी कापसाच्या बोळ्यावर निलगिरीच्या तेलाचे एक-दोन थेंब टाकून त्याचा वास घेत राहा. असे केल्याने तुम्हाला एक ते दोन दिवसांत नाक वाहण्यापासून आराम तर मिळेलच, पण त्याचबरोबर जर सर्दीमुळे नाक बंद झाले असेल तर त्यापासूनही आराम मिळेल. 

हेल्दी फूड खा निरोगी शरीर ठेवा...

  • - सध्याच्या मिश्र वातावरणात हेल्दी फूड खाण्यावर भर द्या. आजारांपासून वाचण्यासाठी आहारात प्रोटीनची मात्रा जास्त असेल अशा पदार्थांचेच सेवन करा. फळ, भाज्या, नट्ससारख्या गोष्टींचे सेवन करा. त्याचबरोबर जेवणात अशा गोष्टींचा समावेश करा की, ज्यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम (चयापचय क्रिया) वाढेल. त्यामुळे तुम्ही आजारी पडणार नाही. 
  •  
  • व्यायाम करा शरीर तंदुरूस्त ठेवा
  • - आठवड्यातून किमान ५ ते ६ वेळा ३० मिनिटांचा वॉक घ्या किंवा व्यायाम केल्यामुळे शरीरातील तापमान गरम राहील आणि त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढेल.

 गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा

  • - हिवाळ्यात घसा खवखवणे, ताप येणे यांसारखे आजार वाढीस लागतात. कारण, हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे या समस्या उद्भवतात. अशा वेळी गरम पाणी, गरमागरम सूप प्यायल्याने शरीराला गरमी मिळेल. त्याचबरोबर जर तुम्ही गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास घशाला आराम मिळेल.

कोमट पाण्याने अंघोळ करा

  • - थंडीत थंड पाण्याने अंघोळ करण्याची हिंमत खूप कमी जणांमध्ये असते. म्हणूनच खूप जण थंडीमध्ये कडक गरम पाण्याने अंघोळ करतात. पण गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा कोरडी होते आणि अंघोळ झाल्यानंतर जास्त थंडी लागते. म्हणूनच जास्त गरम पाण्याने अंघोळ करण्यापेक्षा कोमट पाण्याने अंघोळ करा.
टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटलTemperatureतापमान