शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणी, समाजसेवक एकत्र आल्यास विकास

By admin | Updated: September 3, 2014 01:08 IST

निशिगंधा माळी: जिल्हा युवा पुरस्काराचे वितरण

सोलापूर : समाजसेवक नेहमीच राजकारण्यांना दोष देत केलेल्या कामांवर आक्षेप घेतात. हे दोघे कधी एकत्र बसून विकासाचा आराखडा बनवत नाहीत. ज्यावेळी समाजसेवक व राजकारणी एकत्र येऊन विचारविनिमय करतील, त्यावेळीच विकास होण्यास मदत होणार असल्याचा आशावाद जि. प. च्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हा युवा पुरस्काराच्या वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि. प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डुबे होते. यावेळी प्रताप कचरे यांना युवा तर ड्रीम फाउंडेशनला संस्था पुरस्कार देण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, क्रीडा अधिकारी अनिल देशपांडे उपस्थित होते. एक शिक्षक उत्तमरित्या अध्यापनाचे काम केल्यास त्याच्या हातून सात पिढ्यांचा उद्धार होऊ शकतो. अभियंता आयुष्यभर अभियंताच राहतो. डॉक्टर आपलाच पेशा करतो तर शिक्षक मात्र समाजातील विविध घटक घडविण्याचे काम करीत असल्याने देशाच्या जडणघडणीत त्याचा मोलाचा वाटा असतो. राजकारणात सध्या वाईट प्रवृत्ती जन्म घेत असल्याने अधोगती होत आहे, यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन निर्धार केल्यास विकास होणे शक्य आहे. राष्ट्रीय एकात्मता, व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिल्यास समस्या नष्ट होण्यास मदत होणार आहे. मात्र यावर कोणीच विचारमंथन करीत नसल्याने प्रश्न व समस्या तशाच असल्याचेही त्यांनी सांगितले. एकाला मिळालेले ज्ञान ते दुसऱ्याला दिल्यास दुसऱ्याला एक भाकरी मिळण्यास मदत होते. यासाठी प्रत्येकांनी ज्ञानाची देवाणघेवाण करणे गरजेचे आहे, असा सल्लाही डॉ. माळी यांनी दिला. प्रास्ताविकात भाग्यश्री बिले यांनी देशाच्या जडणघडणीमध्ये युवकांचा मोठा योगदान असल्याने शासन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कार देत असल्याचे सांगितले. यावेळी प्रताप कचरे व काशिनाथ भतगुणकी, अनिल देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले.