शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

द्राक्ष हंगामास लवकरच प्रारंभ होणार

By admin | Updated: November 28, 2014 23:47 IST

मिरज पूर्वमध्ये तयारी : हंगामपूर्व तीनशेहून अधिक दराची अपेक्षा

प्रवीण जगताप - लिंगनूर -मिरज पूर्व भागात यंदा डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात द्राक्षाचा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानाने बसलेला रोगाचा फटका आणि अवकाळी पावसाच्या तडाख्यातून औषधांच्या जोरावर पिकविलेली द्राक्षे दरात तरी तारणार का, याची चिंता उत्पादकांना लागून राहिली आहे.द्राक्ष उपादनासाठी नाशिकपाठोपाठ सांगली आणि सोलापूर जिल्हा प्रसिद्ध आहे, पण हंगामाची सुरुवात सर्वप्रथम सांगली जिल्ह्यात होते. त्यातही प्रतिवर्षी मिरज पूर्व भागातून प्रारंभ होतो. मिरज पूर्व भागात किमान २५ टक्के द्राक्ष उत्पादक जुलैअखेर व आॅगस्ट महिन्यातील फळछाटणी घेण्याचे धाडस करतात. चांगल्या दराच्या अपेक्षेने रोग व हवामानाचा धोका पत्करून ही छाटणी घेतात. मागील बऱ्याच वर्षांचा अनुभव लक्षात घेता मिरज पूर्व भागातील संतोषवाडी, खटाव, कदमवाडी, बेळंकी, लिंगनूर येथून जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास प्रारंभ होतो. गतवर्षी डिसेंबर महिन्यातच हंगाम सुरू झाला होता. पहिल्या द्राक्षांना व्यापाऱ्यांनी २८१ रुपये प्रति चार किलो असा दर दिला होता. द्राक्षांचा रंग, रूप, चव, आकार, साखर आदी बाबी तपासून त्यांना दर निश्चित केला जातो. येथील द्राक्ष हंगामास लवकर प्रारंभ होतो म्हणून हैदराबाद, आंध्र प्रदेश, शिमोगा या भागातील व्यापारीही या भागाकडे विशेष लक्ष ठेवून असतात. यंदा मागील दोन महिन्यांचा आढावा घेतल्यास अवकाळी पाऊस, रोगांचे थैमान या परिस्थितीतून द्राक्षबागा कशाबशा वाचवत अनेकांनी हंगामाची तयारी केली आहे. त्यामध्ये औषध फवारणीवर मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. त्यामुळे यंदा तास-ए-गणेश, सोनाक्का, आंबेसोनाक्का या द्राक्षांना तीनशे रुपयांचा दर, तर शरद सीडलेस (काळी) द्राक्षांना चारशे ते साडेचारशे रुपयांचा दर मिळावा, अशी अपेक्षा आगाप छाटणी घेतलेल्या उत्पादकांना आहे.डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात खरेदीसाठी व्यापाऱ्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यावेळीच यंदाचा दर निश्चित होणार आहे. या साखर कमी भरणाऱ्या द्राक्षांना हंगामपूर्व काढणी व उपलब्धतेमुळे परराज्यातही अपेक्षित दर मिळतो. त्यामुळे व्यापारी यंदा चांगला दर देऊन रोग आणि अवकाळीने हडबडलेल्या द्राक्ष उत्पादकांना दिलासा देतील, या अपेक्षेत उत्पादक आहेत.