शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या घोणस सापास मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:34 IST

मोहोळ तालुक्यातील येणकी गावातील शेतकरी लहू पंढरी जाधव यांच्या विहिरीमध्ये घोणस हा विषारी साप पडल्याची माहिती त्यांनी मोहन ...

मोहोळ तालुक्यातील येणकी गावातील शेतकरी लहू पंढरी जाधव यांच्या विहिरीमध्ये घोणस हा विषारी साप पडल्याची माहिती त्यांनी मोहन माने यांना दिली. माने यांनी त्वरित त्यांचे मामा व वाईल्डलाईफ कॉझर्वेशन असोसिएशनचे सदस्य सोमानंद डोके यांना याबाबत कळविले. त्यांनतर सदस्य डोके व सुरेश क्षीरसागर दोघे सोलापूरहून जवळजवळ ५० किमीचा प्रवास करून येणकी गावात दाखल झाले. तेथे पोहोचल्यानंतर विहिरीची पाहणी केली. विहिरीला पायऱ्या नसल्याने सापांना बाहेर कसे काढायचे हा मोठा प्रश्‍न दोघांसमोर उभा राहिला.

यावर त्यांनी शक्कल लढवून एक भाजीचे कॅरेट व दोन दोऱ्यांच्या सहाय्याने दोन्ही बाजूने बांधून कॅरेटला अलगदरित्या विहिरीत सोडण्यात आले.

ते कॅरेट विहिरीत पडलेल्या सापांजवळ नेऊन एकेक सापांना अलगदरित्या कॅरेटमध्ये उचलून विहीरीतून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले. त्या सापांना सुरक्षितरित्या विहीरीबाहेर काढल्यानंतर त्यांना एका पोत्यामध्ये बंद करून पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात सोडून देण्यात आले.

या बचावकार्यात शेतकरी लहू जाधव, मोहन माने, शुभम माने व वाईल्डलाईफ कॉझर्वेशन असोसिएशनचे

सदस्य सोमानंद डोके व सुरेश क्षीरसागर उपस्थित होते.

---

१०० सापांना आजवर जीवदान

आजतागायत विहीरीत पडलेल्या अशा तब्बल १०० सापांना वाईल्डलाईफ कॉझर्वेशन असोसिएशनच्या माध्यमातून

सुरक्षित बाहेर काढून जीवदान देण्यात आलेले असल्याचे सोमानंद डोके व सुरेश क्षीरसागर यांनी सांगितले.

फोटो २२वडवळ-साप

येणकी येथील विहिरीमधून घोणस सापांना असे कॅरेट मधून बाहेर काढण्यात आले.