शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक कामाचा हिशोब लावला जातो गावाच्या वेशीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST

माढा तालुक्यातील उजनी टे. ही गेल्या वीस वर्षांपासून आदर्श ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यात ओळखली जाते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान विभागीय ...

माढा तालुक्यातील उजनी टे. ही गेल्या वीस वर्षांपासून आदर्श ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यात ओळखली जाते. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान विभागीय पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते दिल्लीत उजनी ग्रामपंचायतीला मिळाला आहे. निर्मलग्राम पुरस्कार मिळाला आहे.

प्रत्येक महिन्यात गावात मासिक सभा बोलाविली जाते, त्याचप्रमाणे २३ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ग्रामसभा पार पडली. यावेळी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. गावाला कोणताही निधी आला की, त्याचा तपशील गावच्या वेशीवर व नोटीस बॉर्डवर लावायचा. त्याप्रमाणे १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून भविष्यात करावयाची कामे, गावातील विविध विकासकामांची वरिष्ठ कार्यालयाकडे केलेली मागणी, सध्या गावात चालू असलेली विकासकामे, सध्या ग्रामपंचायतीचा झालेला जमाखर्च, गावातील चिंचेच्या झाडाचा करावयाचा लिलाव, गावात करावयाची पथदिव्यांची सुविधा, यासाठी लागणारा निधी आतापर्यंत झालेला खर्च हा सर्व खर्च ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर व गावच्या वेशीवर लावण्यात आला. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

ग्रामसभेला राष्ट्रवादी काँग्रेस माढा विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील, सरपंच सोनाली मेटे-पाटील, उपसरपंच संगीता पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीपराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुशीला पाटील, अनिता माने, कल्याणी गवळी, गणेश बनसोडे, धनाजी मुरकुटे, विठ्ठल मेटे, बाळासाहेब पाटील, सतीश पाटील, पोलीसपाटील संजय गायकवाड, ग्रामसेवक सतीश धायगुडे, संतोष मेटे, मल्हारी गवळी, शुभम माने, नागनाथ बनसोडे आदी उपस्थित होते.

----२७भीमानगर- उजनी टे. ---

उजनी टे. ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील कामाच्या हिशोबाची यादी नोटीस बोर्डावर लावली आहे. सोबत सदस्यांसह मान्यवर.

----