शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सुक्या गवताचा तुटवडा

By admin | Updated: November 22, 2014 00:12 IST

अनियमित पाऊस : पशुपालन व्यवसायावर परिणाम

महेश चव्हाण - ओटवणे --सह्याद्री पट्ट्याच्या तळाशी राहणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जवळजवळ शंभर टक्के भातशेती कापणी पूर्ण झाली आहे. मात्र, उत्पन्नाबरोबरच गवत चाऱ्याचा विचार करता पुढील वर्षी पावसाळ्यात गवतचाऱ्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा शेतकऱ्यांना जाणवणार आहे. गवत-चाऱ्याच्या या कमतरतेमुळे पशुपालन व्यवसायावरही त्याचे विपरीत परिणाम होत असून या व्यवसायाला आता उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. सह्याद्री पट्ट्यातील ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पावसाळी भातशेती करतात. पावसाळी भातशेतीवरच येथील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे आर्थिक साधन आणि गुरांसाठी गवत चारा अवलंबून असतो. यावर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे उत्पन्न तर घटलेच, शिवाय गवत चाऱ्यावरही याचा वितरीत परिणाम झाला आहे. मे-जून महिन्यात जोरदार कोसळणारा पाऊस लांबणीवर गेल्याने भातशेती उशिरा झाली. त्यामुळे साहजीकच बदलत्या वातावरणामुळे त्याचा परिणाम पिकांच्या वाढीवर झाला. त्यातच गवते डोलू लागल्यानंतर लागणाऱ्या अवेळी पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला आणि भूमिगत झालेला गवतचारा कुजून गेला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर भातशेतीत मोठ्या प्रमाणात केला जातो. कमी उंचीची आणि अधिक उत्पन्न देणारी बी-बियाणी लावली जात असल्याने या शेतीत गवताचा चारा कमी मिळतो. सह्याद्री पट्ट्याच्या गावातील लोकांची भातशेती ही अधिक प्रमाणात डोंगराळ भागातच आहे. मात्र, या भातशेतीवर जंगली प्राणी तुटून पडत असल्याने या भागातील शेती करणे शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक ठरते. त्यामुळे येथील जमिनी अधिकतर पडीकच ठेवल्या जातात. तसेच जंगली प्राणी चारासुद्धा फस्त करू लागल्याने गुरांसाठी डोंगराळ भागातील चवदार गवत मिळणे कठीण होऊन बसले आहे. गवत हे गुरांसाठी महत्त्वाचे आणि प्राथमिक अन्न आहे. मात्र, ऐन उन्हाळी आणि पावसाच्या सुरुवातीला या गवताचा तुटवडा भासू लागतो. पुरेशा प्रमाणात गवत उपलब्ध होत नसल्याने गुरांची परवड होते. त्यामुळे गुरांना मोकाट सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. गवताच्या कमतरतेमुळे पशुपालन व्यवसायालाही आता उतरती कळा लागली आहे. याचा दुग्धोत्पादनावरही परिणाम होत आहे. शहरात मोकाट जनावरांची संख्या वाढलीपशुपालन हा शेती व्यवसायाचा जोड धंदा. परंतु शेतीतून मिळणारे गवतच तुटपुंजे असल्याने त्याचा परिणाम पशुपालनावर होऊन गुरे मोकाट सोडण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. ही मोकाट जनावरे शहरातही दाखल होत असल्याने शहरी भागात मोकाट जनावरांची संख्या वाढू लागली आहे.