शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाचे निकष बदलणार : मुख्यमंत्री

By admin | Updated: August 19, 2014 00:58 IST

काँग्रेस कमिटी : कार्यकर्त्यांशी संवाद

सोलापूर : सध्या प्रचलित असलेली पावसाची सरासरी करण्याची पद्धत चुकीची असल्याने दुष्काळ जाहीर करण्यासाठी निकष बदलण्याची गरज आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलून दाखविली. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवे निकष ठरविणार असल्याची माहिती त्यांनी दिली.सोलापूर काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, कुठे जास्त तर कुठे कमी पाऊस पडतो, पावसाच्या या विसंगत आकडेवारीचा सरासरीवर परिणाम होतो. बहुतेक वेळा एकाच तालुक्यात एखाद्या गावात जोरदार पर्जन्यवृष्टी होते तर त्याच तालुक्यातील काही गावांना पिण्याच्या पाण्याची भ्रांत असते. तरीही सरासरी वाढल्याने अवर्षणग्रस्त जनतेवर अन्याय होतो. हा अनुभव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सध्याची दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत बदलण्याची गरज असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत नवे निकष ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील १२३ तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्यात आली आहे. इतर तालुक्यांची आकडेवारी उपलब्ध होताच निर्णय घ्यावा लागेल असे सांगताना दुष्काळग्रस्तांना सर्व सोयी—सवलती देण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शविली. राज्यातील ११ जिल्ह्यांत पावसाची सरासरी ५0 टक्क्यांपेक्षा जास्त असली तर उर्वरित जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी सांगितले. ------------------------------नेत्यांना चिंता...सध्याच्या दुष्काळी स्थितीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताना जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी मोहोळचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्याची मागणी केली. आ. भारत भालके यांनी मंगळवेढ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी संपूर्ण जिल्हाच दुष्काळी जाहीर करण्याची मागणी करीत मुख्यमंत्र्यांसह सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.--------------------------------