शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कृष्ण तलाव परिसरात देशी-विदेशी पक्ष्यांचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:22 IST

मंगळवेढ्यात वरचेवर भाविकांची संख्या वाढत आहे. या संतभूमीत येणारा भाविक हा वेगवेगळ्या मंदिरांना भेटी तर देतोच; परंतु या तलावावर ...

मंगळवेढ्यात वरचेवर भाविकांची संख्या वाढत आहे. या संतभूमीत येणारा भाविक हा वेगवेगळ्या मंदिरांना भेटी तर देतोच; परंतु या तलावावर निसर्गाचे अनोखे रूप पाहण्यासाठी नक्कीच जातो. निसर्गप्रेमी व पक्षीप्रेमी नागरिकांची वर्दळ वाढतच आहे. हे एक निसर्गरम्य पर्यटन व पक्षी निरीक्षण केंद्र म्हणून उदयास येऊ शकते.

कृष्ण तलाव हा मंगळवेढ्यापासून जवळच आहे. या तलावाला स्वतःचा असा एक इतिहास आहे. २०१६ ला या तलावातील गाळ काढला व त्याची खोली वाढविली. आता याठिकाणी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता निश्चितच वाढली आहे. याच तलावाच्या काठावर वृक्षारोपण केल्याने पक्ष्यांना अधिवासासाठी सुरक्षित व नैसर्गिक ठिकाण उपलब्ध झाले आहे. या तलावाला सामाजिक कार्यकर्ते व अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट दिली आहे. तसेच रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारची रोपे झाडे लावून हा परिसर निसर्गरम्य केला आहे.

गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तळसंगी, शिरनांदगी, खोमनाळ या परिसरात किंगफिशर, पाईड किंगफिशर, हळदीकुंकू बदक, चातक, स्थूनशील, वेडा राघू, शेलडक, वेगवेगळ्या प्रकारच्या घारी, पांढर्‍या भुवईची नाचण, निलकंठी, माशीमार, भांगपाडी, मैना, धनेश, ठिपकेवाला, पिंगळा, पांढर्‍या मानेचा करकोचा, चितूर, मुनिया, वारकरी, कवड्या परीट, हुदहुद्या असे असंख्य आकर्षक पक्षी पाहावयास मिळत असल्याचे पक्षी अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार राजू रायबान यांनी सांगितले.

संतनगरीत कृष्ण तलाव नावारूपाला येईल

याठिकाणी विविध सेवा-सुविधा देत शासन व नगरपालिकेने या तलावावर थोडेफार पैसे खर्च केल्यास संतनगरीत हा कृष्ण तलाव नावारूपाला येईल. संतांबरोबर या तलावाचे पर्यटन व निसर्गरम्य पर्यटनक्षेत्र व पक्षीनिरीक्षण केंद्र म्हणून निश्चितच नावारूपाला येऊ शकते.

कोट :::::::::::::::::

मंगळवेढा येथील कृष्ण तलाव आणि ग्रामीण भागातील तलावांमध्ये विविध जातीचे पक्षी आढळून येत आहेत. येथील परिसरात असलेली विविध झाडे आणि तलावातील पाणी जतन केले पाहिजे.

- राजू रायबान

पक्षी अभ्यासक