शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गल्ल्या वाटून घ्या आन्‌ लागा कामाला..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:11 IST

‘अण्णा, आप्पा, आजी तुम्ही फकस्त सांगा आमी तुमच्या सेवेला हजर आहे’ आश्वासनांच्या खैरातीला तर तोडच नाही. पुण्या-मुंबईला गेलेल्या मंडळींना ...

‘अण्णा, आप्पा, आजी तुम्ही फकस्त सांगा आमी तुमच्या सेवेला हजर आहे’ आश्वासनांच्या खैरातीला तर तोडच नाही. पुण्या-मुंबईला गेलेल्या मंडळींना मतदानाला परत येण्याचे आवतान देण्यात येऊ लागलंय. साराच माहोल आता निवडणूकमय होऊ लागलाय. जिवाभावाची भावकी, आप्तेष्ट सत्तेच्या सारिपटासाठी आमने-सामने उभे ठाकले आहेत. हे सारंच अघळपघळ बघून गावोगावी पारावरच्या गप्पांनाही उधाण आलं आहे. गावातला मुरब्बी इरसाल दामूतात्या म्हणतो कसा ‘मर्दानू या पुढारी आन्‌ उमेदवारासनी आपल्याबद्दल लई पिरेम ऊतू चाललंय लेका’ यावर एकच हशा पिकला अन्‌ शिरपा सकट म्हणाला ‘तात्या पुढच्या पाच-सात दिवस हे असंच चालणार.. आता जेवणावळीलाबी रंगत येणार बगा’

‘ह्यूद्या काय व्हायचाय त्ये. पण नक्की आपल्या मदतीला जो मानूस ईल त्यलाच आपून निवडून द्यायला पाहिजे’ - कॉलेजात जाणारा धोंडिबामामाच्या उमेशनं आपलं म्हणणं मांडलं.

पारावरच्या मंडळींनी उमेशच्या म्हणण्यावर माना डोलावल्या. ‘हे म्हणणं मातूर आक्षी खराय बाबानू’ दामूतात्यानंही मान डोलावत आपला होकार कळवला.

आरं पण अण्णा, आप्पा, दादा, मामांना चालंल का? खालच्या गल्लीचा नामू बंडगर उद्‌गारला. ‘ये गप्प रं तू. तुजं एक मधीच कायतर असतंय बग.. आपून कुटं कुणाला इरोध करालाव.. आपल्याला फकस्त आपल्या कामाला येणाऱ्या मानसला निवडायचं एव्हढचं बोलायलाव की. दामूतात्या खराय का? न्हाय.

व्हयऽ व्हयऽऽ खराय रं नामू तुजं.. दुसरीकडं कुटं कायबी ह्यूद्या. आपल्या गावात काम करणाऱ्याच मतं द्यायची. समद्यानी गल्ल्या वाटून घ्या आन्‌ लागा कामाला म्हणत दामूतात्यानं चंचीतली तंबाखू काढून बार भरला अन्‌ एकेक करीत पारावरून घराकडे वळले...

- इल्लूभाई