शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

गावोगावी वीज ग्राहक व वीजवितरण अधिकाऱ्यांत वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST

वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी वीज वितरणतर्फे मोहीम सुरू आहे. ग्रामीण भागात थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. ...

वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी वीज वितरणतर्फे मोहीम सुरू आहे. ग्रामीण भागात थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. या पार्श्वभूमीवर गावोगावी वसुलीसाठी गेलेल्या महावितरण अधिकारी, वायरमन व वीज ग्राहकांत खटके उडत आहेत. नागरिक निम्मे अथवा थोडे कमी बिल भरतो; पण कनेक्शन तोडू नका, अशी विनंती करत आहेत. मात्र, काही अधिकारी ही विनंती धुडकावत वीज कनेक्शन तोडण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे वादावादी होत आहे.

रविवारी नदीकाठच्या काही गावांत महावितरणचे सहाययक अभियंता, वायरमन गोरगरिबांना धमकावत सक्तीने वीज बिल वसुली करीत असल्याच्या नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आहेत. हा पोरकटपणा महावितरणच्या अधिकारी व वायरमननी तत्काळ थांबवावा, लोकांच्या भावनांचा उद्रेक होऊ देऊ नये, असा इशारा राजन पाटील यांनी दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद होते. ज्यांचे रोजच्या कमाईवर सर्वकाही अवलंवून असते, अशा लोकांचे हाल झाले. त्यांचे व्यावसायिक, घरगुती लाइटबिल अवाच्या सव्वा आले आहे. अनलॉक झाले तरी अनेकांचे व्यवसाय अजूनही सुरळीत सुरू झालेले नाहीत. मात्र, सर्वसामान्य लोकांकडून बळजबरीने वसुली करण्यात येत आहे. यातून मार्ग काढण्याचे कोणतेही पाऊल आपल्याकडून उचलले गेल्याचे दिसत नाही. सर्वसामान्य जनतेचा विचार कोणीही करताना दिसत नाही, असे राजन पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कोट :::::::::::::::::::

कोरोनाच्या संकटामुळे अनेक जण आर्थिक अडचणीत आहेत. यामुळे थकबाकीमध्ये नागरिकांना टप्पे पाडून देऊन बिल भरून घेण्याऐवजी अधिकारी, कर्मचारी वीज कनेक्शन तोडण्याची धमकी देत पठाणी वीज बिल वसुली करीत आहेत. अशा महावितरणच्या सहायक अभियंता अधिकाऱ्यावर कारवाई करा.

-अप्पासाहेब देशमुख,

नागरिक ब्रह्मपुरी

कोट ::::::::::::::::::

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आमच्यावर वीज बिल वसुलीसाठी मोठे प्रेशर आहे. त्यामुळे आम्हाला वीज बिल न भरणाऱ्यांचे मीटर काढून आणण्याचे सक्त आदेश दिले आहेत.

- भगवान आलदर,

सहायक अभियंता, वीज वितरण