शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता, मयताच्या नावावर मतदान करुन मिळवला विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीनंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील पहिली तक्रार तहसील कार्यालयाला आली आहे. एकरुख- तरटगाव ग्रामपंचायतीच्या वाॅर्ड नंबर-१ ...

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीनंतर उत्तर सोलापूर तालुक्यातील पहिली तक्रार तहसील कार्यालयाला आली आहे. एकरुख- तरटगाव ग्रामपंचायतीच्या वाॅर्ड नंबर-१ मधून नसीर अहमद जहागीरदार विरोधात बळीराम सोनवणे व शाम उडाणशिवे विरोधात उमाकांत सोनवणे लढले. यामध्ये नसीर अहमद जहागीरदार यांना ११४ तर बळीराम सोनवणे यांना ११३ मते मिळाली. जहागीरदार हे एका मताने विजयी झाले. शाम उडाणशिवे यांना ११६ तर उमाकांत सोनवणे यांना १११ मते मिळाल्याने उडाणशिवे पाच मतांनी विजयी झाले.

पराभूत उमेदवारांनी तहसीलदारांना दिलेल्या तक्रारी अर्जात रमेश उडाणशिवे हे १० ते १५ वर्षापासून बेपत्ता आहेत मात्र त्यांचे मतदान मुलाने केले असल्याचे म्हटले आहे. अंबादास उडाणशिवे, राधाबाई उडाणशिवे व मुरलीधर सोनवणे हे मयत असूनही त्यांचे मतदान झाले आहे. तसेच नागनाथ साबळे यांचे नाव मतदार यादीत १० व २०६ क्रमांकावर व किसन उडाणशिवे यांचे नाव ५६ व २८० नंबरला आहे. दोन्ही ठिकाणी मतदान झाले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

---

आरक्षण नव्याने काढा.. तहसीलदारांकडे पत्र

वांगी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षण आहे. मात्र येथे अनुसूचित जातीची महिला सदस्य नाही. हनुमंत गाडे यांनी निवडणूक उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांना पत्र देऊन सरपंच आरक्षण नव्याने काढण्याची मागणी केली आहे.

- खेडचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले. मात्र या संवर्गाचा सदस्यच नाही. तरी आरक्षण बदलून देण्यात यावे अशी मागणी नागेश कोकरे यांनी तहसीलदाराकडे केली आहे.

----