शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

दिराचा खून करुन खड्ड्यात गाडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:45 IST

सांगोला (जि. सोलापूर) : दारू पिऊन सतत त्रास देत असल्याने संतापलेल्या दिराचा स्वत:च्या दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने लाकडी काठीने ...

सांगोला (जि. सोलापूर) : दारू पिऊन सतत त्रास देत असल्याने संतापलेल्या दिराचा स्वत:च्या दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने लाकडी काठीने डोक्यात मारहाण करून खून केला. या घटनेची कोठेही वाच्यता होऊ नये व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने दिराचा मृतदेह राहत्या पालाच्या घरात खड्डा खोदून गाडला. नाझरे (ता. सांगोला) येथे ही घटना घडली.

आकाश बाबासाहेब शिंदे असे मृताचे नाव आहे. कासाबाई शिंदे (वय ३५) हिच्यासह दोन अल्पवयीन मुलांवर (सर्व रा. नाझरे, ता. सांगोला) सांगोला पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

खानापूर (जि. सांगली) येथील गोसावी समाजातील विकास शिंदे हा ५ ते ७ वर्षापूर्वी मयत झाला आहे. त्याची पत्नी कासाबाई ही दीर आकाश शिंदे याच्यासमवेत त्याच्या तीन मुलांसह राहात होती. आकाश शिंदे हा पोटासाठी भिक्षा मागून उर्वरित वेळेत भंगार वेचून उदरनिर्वाह चालवित होता. आकाश शिंदे भावजय कासाबाईसह तासगाव, खानापूर, आटपाडी, झरे आणि नाझरे (ता. सांगोला) येथे फिरून व्यवसाय करीत त्याच भागात राहात होता.

आकाश शिंदे यास दारूचे व्यसन असल्याने तो कासाबाईस त्रास देत होता. आकाशचे वडील बाबासाहेब शिंदे आल्यानंतर आकाश कोठे गेला आहे, असे विचारले. त्यावेळी कासाबाईने १५ दिवसापूंर्वी भिक्षा मागण्यासाठी गेल्याचे सांगितले. मात्र, सून मंजुषा प्रकाश शिंदे हिने कासाबाई आणि तिच्या दोन मुलांनी आकाशला काठीने मारुन त्याचा खून केल्याचे सांगितले.

ही घटना समजताच वडील बाबासाहेब शिंदे यांनी नातवास सोबत घेऊन खानापूर पोलीस स्थानक गाठले. तेथील पोलिसांनी ही घटना सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तेथे तक्रार देण्यास सांगितले. सांगोला पोलिसांनी आकाशच्या मुलाकडे सखोल चौकशी केली असता खुनाची घटना उघडकीस आली. याबाबत, बाबासाहेब पुंडलिक शिंदे (रा. खानापूर, जि. सांगली) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी कासाबाई शिंदे हिच्यासह तिची दोन अल्पवयीन मुले या तिघांवर भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक माने करीत आहेत.

इन्फो

मुलाच्या सांगण्यावरून फुटले खुनाचे बिंग

आकाश शिंदे याच्या अल्पवयीन मुलाच्या सांगण्यावरून वडिलांच्या खुनाचे बिंग फुटले. विशेष म्हणजे आकाशचा मृतदेह पालाच्या घरात गाडून कासाबाई ही १० ते १२ दिवसांपासून बिनधास्त वावरत होती. खुनी कितीही हुशार असला तरी पाठीमागे पुरावा सोडतोच आणि नेमके आकाश शिंदेच्या बाबतीत हेच घडल्याने तिघांना गजाआड व्हावे लागले.